घरमनोरंजनगेली चार वर्षे इंडस्ट्रीत काम नाही, अभिनेत्री शगुफ्ता अलीवर आली घर विकण्याची...

गेली चार वर्षे इंडस्ट्रीत काम नाही, अभिनेत्री शगुफ्ता अलीवर आली घर विकण्याची वेळ

Subscribe

कोरोना विषाणूने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे. अनेकांचे हसते खेळते घर, संसार या कोरोनाने उद्ध्वस्त केले. तर काहींना दोनवेळचे जेवणं मिळणेही अवघड झाले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील सर्व आर्थिक व्यवसाय, नोकऱ्या ठप्प झाल्या. याचा गंभीर परिणाम बॉलिवूड आणि एकंदरीत सिनेसृष्टीवर झाला. कोरोनामुळे अनेक मालिका, चित्रपट आणि इतर शुटिंग पूर्णपणे थांबवण्यात आल्या. मात्र कोरोना नियमांचे बंधन ठेवत गेल्या महिन्यापासून शुटिंगला परवानगी देण्यात आली. यात फक्त मुख्य कलाकार आणि क्रू मेंबर यांनाच सेटवर येण्याची परवानगी आहे. यामुळे सिनेसृष्टीशी निगडीत इतर कलाकार आणि एकूणच कामगारांवर सध्या बेरोजगारीची वेळ आली आहे. या कलाकारांसमोर घराचे आर्थिक चक्र कसे चालवायचे अशा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. तर अनेकांवर पैशाच्या अडचणीमुळे राहते घर विकण्याची वेळ आली आहे. अशाच परिस्थितीतून सध्या एक बॉलिवूड अभिनेत्री आपले आयुष्य जगत आहे. बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री शगुफ्ता अलीची कोरोनामुळे आर्थिक स्थिती खूप हालाखीची झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये स्थिती आणखी बिकट

शगुफ्ता अली चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतात गेली २० वर्षे सक्रिय असलेल्या तिने अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. ज्यामध्ये ‘बेपनाह’ आणि ‘एक वीर की अरदास वीरा’सारख्या मालिकांचा समावेश आहे. अनेक सीरियल व चित्रपट केलेल्या शगुफ्ता सध्या कामाच्या कामाच्या शोधात आहे. लॉकडाऊन पूर्वीची दोन वर्ष आणि आता लॉकडाऊननंतरची दोन वर्षे असे एकूण चार वर्षे शगुप्ताकडे कोणताही प्रोजेक्ट आला नाही. यात कोरोना परिस्थिती निवळत असली तरी इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे अवघड झाले आहे. यामुळे तिची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. सध्या तिच्याकडे उपचार घेण्यासाठी देखील पुरेसे पैसे नाहीत.

- Advertisement -

गेल्या चार वर्षांपासून कोणतेही काम मिळाले नाही

माध्यमांशी बोलताना शगुफ्ता अलीने आपल्या वेदना जगासमोर मांडल्या. शगुफ्ताने आपल्या भावना व्यक्त करताना सांगिते की ‘मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच बर्‍याचे कष्ट केले. परंतु आज मी बर्‍याच रोगांशी लढा देत उभे आहे. आज मी ५४ वर्षांची असून दिवसेंदिवस माझी तब्येत ढासळत आहे. डायबिटीसमुळे माझ्या पायांवर फार वाईट परिणाम झाला आहे. मानसिक ताणमुळे माझ्या शरीरातील शुगरची पातळी वाढली आहे. आता माझ्या डोळ्यांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे यामुळे मला उपचारांची फार गरज आहे. त्या पुढे सांगतात की, ‘मला गेल्या चार वर्षांपासून कोणतेही काम मिळालेले नाही यामुळे माझी आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे.’ शागुफ्ता अलीने सांगितले की, त्यांना अनेक ऑफर येत्या येत्या राहिल्या. त्याने एक चित्रपट केला पण तोही पूर्ण झाला नाही.

कर्करोगाशी केला सामना

फारच थोड्या लोकांना माहिती आहे की, शगुफ्ता अली यांनी कर्करोगाविरोधातील लढाई जिंकली आहे. यावर बोलताना शगुफ्ता अली यांनी सांगितले की, त्यांना तिसऱ्या टप्प्याचा कॅन्सर होता. यामुळे गेली २० वर्षे त्या आजारी आहेत. लहानपणापासूनचं त्या आजारांचा सामना करत आल्या. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील कर्करोगाविरोधातील लढाई देखील त्या यशस्वीरित्या जिंकल्या. त्यांनी त्यांच्या खास मित्रांव्यतिरिक्त कोणालाही याबद्दल सांगितले नाही. त्यांना बेस्ट कॅन्सर होता, तोही तिसऱ्या टप्प्यातील. यामुळे त्यांना त्यांचे स्तन काढून टाकावे लागले. यासाठी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच केमोथेरपी केली गेली. त्यांच्यासाठी हे एक नवीन जीवन होते.

- Advertisement -

कामासाठी समर्पित

शगुफ्ता अली नेहमीच कामाप्रती समर्पित होत्या. कर्करोगाच्या उपचारानंतर केवळ १७ दिवसातचं शगुफ्ता आपल्या कामावर रुजू झाल्या. यावर त्या सांगतात की, ‘त्यावेळी माझ्याकडे बरेच काम होते आणि मला माझ्या जबाबदाऱ्यांविषयी पूर्ण माहिती होती. परंतु यावेळी मी दुखापतग्रस्त झाले. अपघातामुळे माझा पाय तुटला. वडिलांना भेटायला जात असताना हा अपघात झाला आणि माझे हाड दोन तुकडे झाले. यामुळे माझ्या पायात स्टील रॅड घातलण्यात आली. या सर्व घटनांमुळे माझ्या आयुष्याच्या प्रवासात अनेक आव्हाने आलीत. परंतु त्यांनी कधीही न घाबरता समोरी गेली असे शगुप्ता अली यांनी सांगितले.

‘या’ शो आणि चित्रपटांमध्ये काम केले

१९८९ साली ‘डर’ या मालिकतून शगुफ्ता अली यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्याचवर्षी त्यांनी ‘कानुन अपना-अपना चित्रपटात काम केले. बॉलिवूडमध्ये त्यांनी हिरो नंबर 1, सिर्फ तुम, अजूबा आणि इंचरनॅशनल खिलाडी या चित्रपटात काम केले, तर टेलिव्हिजनवरील एक वीर की अरदास वीर, पुर्नविवाह आणि बेपनाह अशा अनेक मालिकांत काम केले. तर २०१८ नतर, शगुफ्ता अली स्क्रीनवर कुठेही दिसल्या नाहीत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -