घरमनोरंजनश्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप

Subscribe

सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेला श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन पूनावाला नावाच्या मुलाने आपली प्रियसी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन छतरपूरमधील जंगलामध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. ही विकृत घटना समोर आल्यानंतर प्रत्येकजण बिथरुन गेला आहे. दरम्यान, याच संदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वरा भास्करने मांडलं मत

- Advertisement -

दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांड प्रकारावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्टीट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. याबाबत राग व्यक्त करत श्रद्धाने लिहिलंय की, “हे प्रकरण किती भयानक, विकृत आणि दुःखद आहे. माझ्याकडे यासाठी कोणतेच शब्द नाहीत. माझं हृदय या मुलीसाठी रडत आहे. खूप भयानक विश्वासघात, ज्याच्यावर ती प्रेम करत होती आणि ज्या मुलावर ती ऐवढा विश्वास ठेवत होती. आशा आहे की पोलीस लवकरात लवकर त्यांचा तपास पूर्ण करतील आणि त्या राक्षसाला कठोर शिक्षा देतील”.

काय आहे नेमकं प्रकरण
पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, आफताब मुंबईमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. श्रद्धा आणि तो 2019 पासून लिव्हइनमध्ये राहत होते आणि यावर्षाच्या मध्यावर हे दोघे मुंबईहून दिल्लीला आले होते. लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर श्रद्धा आफताबला लग्नाबाबत मागणी करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. आफताब अनेकदा श्रद्धाला मारहान देखील करायचा.

- Advertisement -

काही दिवस आधी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने एक फ्रिज खरेदी केला आणि श्रद्धाच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर छतरपूरच्या जंगलामध्ये आफताबने वेग-वेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले.

 


हेही वाचा :

‘ऊंचाई’ चित्रपटाने 5 दिवसात कमावला करोडोंचा गल्ला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -