घरमनोरंजन#MeToo मध्ये पुन्हा अडकले कैलाश खेर

#MeToo मध्ये पुन्हा अडकले कैलाश खेर

Subscribe

गायिका वर्षा सिंग धनोआ हिनेदेखील कैलाश खेर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला असून तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

गायक कैलाश खेर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सोना मोहापात्रा हिने केलेल्या आरोपानंतर आता आणखी एक गायिका समोर आली असून तिनेदेखील कैलाश खेर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. मी कैलाश खेर यांना गुरूस्थानी मानत होते. २०१५ साली मी पहिल्यांदा त्यांना दुबईच्या एअरपोर्टवर भेटले. आम्ही एकत्र काही फोटोज घेतले. एकमेकांना मोबाईल नंबर दिले आणि आमचे मेसेजेसवर संभाषण सुरु झाले. एके दिवशी त्यांनी मला फोन केली आणि भेटण्याची इच्छा दर्शवली. ते म्हणाले. त्यांना माझं नाव आवडत आणि माझ्यासोबत त्यांना संबंध ठेवायचे आहेत, असे ते म्हणाले असल्याची माहिती गायिका वर्षा सिंग धनोआ हिने एएनआयशी बोलताना दिली.

- Advertisement -

वर्षाने व्हिडिओ जारी करून केला खुलासा

सध्या देशभरात सुरू असलेल्या मीटू मोहिमेत गायक कैलाश खेर यांच्यावर दुसऱ्यांदा हा आरोप होत आहे. यापूर्वी गायिका सोना मोहापात्रा हिनेदेखील कैलाशवर महिलांसोबत चुकीच्या वर्तणुकीबाबत भाष्य केले होते. तर आता वर्षा हिने कैलाशवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर आरोप केला आहे. वर्षा हिने नुकताच एक व्हिडिओ जारी करुन तिच्यावर झालेल्या अन्यायावर वाचा फोडली आहे. तब्बल ११ मिनिटांच्या या व्हिडिओत वर्षाने संपूर्ण माहिती दिली. यामध्ये तिने गायक तोशी साबरीवरदेखील लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर आपण मानसिक तणावाखाली गेलो असून गायन क्षेत्रापासून दूर गेल्याचेही तिने म्हटले होते. यापूर्वी सोना आणि दोन महिला पत्रकारांनीही कैलाश खेर यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -