घरमनोरंजनआलिया लवकरच येणार 'टेलिव्हिजनवर'

आलिया लवकरच येणार ‘टेलिव्हिजनवर’

Subscribe

अभिनेत्री आलिया भट्ट हे नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. आलियाच्या नुकत्याच आलेल्या ‘राझी’ या सिनेमाला लोकांची भरपूर पसंती मिळत असून आलिया देखील सध्या यशाच्या शिखरावर आहे. चित्रपटांधील आपल्या दर्जेदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली आलिया लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. सध्या सर्वत्र याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

छोट्या पडद्यासाठी आलिया ‘राझी’

- Advertisement -

आलिया भट्ट  स्टारप्लस वाहिनी मिळून एक नवा कार्यक्रम लाँच करत असल्याचं सूत्रांनुसार समजत आहे. सध्या आलिया स्टार प्लस वाहिनीवर काहीतरी एक्सक्ल्युझिव शूट करत असल्याचं कळतं आहे. ती या कार्यक्रमासाठी एका धमाल गाण्याचं शूट करत असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. याबद्दल अद्याप नेमका खुलासा झाला नसला तरी आलिया आणि स्टार प्लस वाहिनी एकत्र येत एक धमाकेदार संकल्पना लोकांसमोर आणणार अशी जोरदार चर्चा आहे.

‘बाबा’ की लाडली बेटी 

आलिया स्टारप्लस वाहिनीसोबत गाण्याचे शूट करत असताना, तिचे वडील महेश भट्ट देखील त्यावेळी सेटवर उपस्थित होते. आलियाविषयी बोलताना महेश भट्ट म्हणतात की, ”आलिया हा माझा अभिमान आहे. आलिया नावाजलेल्या वाहिनीसोबत टेलिव्हिजनवर डेब्यू करतेय, याचा मला अभिमान आहे.यानिमित्ताने तिली टीव्ही क्षेत्राचीही ओळख होईल. आजच्या तारखेला ती अनेक लोकांचा आदर्श आहे. अनेक तरूण-तरूणी तिला आपली रोल मॉडेल मानतात. ही सगळी तिची स्वत:ची कमाई आहे. तिने केवळ तिच्या मेहनतीच्या जोरावर ही उंची गाठली आहे.”  कामामध्ये इतकी व्यस्त असलेली आलिया आवर्जून आम्हा सगळ्यांना वेळ देत असल्याचे, आमच्यावर मनापासून प्रेम करत असल्याचे महेश भट्ट सांगतात.

- Advertisement -
‘महेश भट्ट माझे प्रेरणास्त्रोत’

आलिया देखील तिच्या वडिलांचं भरभरुन कौतुक करताना थकत नाही. ती आपल्या वडिलांना आपला आदर्श मानते. ‘महेश भट्ट हे मला वडील म्हणून लाभणं, हे माझं भाग्य असल्याचं’ आलिया सांगते. आलिया म्हणते, ”महेश भट्ट हे जितके उत्तम फिल्ममेकर आहेत तितकेच उत्तम वडील आणि पती आहेत. माझ्या आयुष्यातला ते एक मोठा प्रेरणास्त्रोत आहेत.”

आलियाच्या मोठ्या पडद्यावरील कामाचे आजवर तिच्या चाहत्यांनी  भरभरुन कौतुक केले आहे. आता तिच्या छोट्या पडद्यावरील पदार्पणाला चाहते कशी पसंती देतायत हे पाहाणं औत्सुक्यांचं ठरेल. मात्र आलिया म्हटलं आपल्याला नक्कीच काहीतरी धमाकेदार आणि दर्जेदार कलाकृती पाहयला मिळणार यात शंका नाही.

टीव्हीवर झळकलेले ‘बॉलीवूड स्टार्स’

याआधी अशाचप्रकारे काही बॉलीवूड कलाकारांनी ते यशाच्या शिखरावर असताना, टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. छोट्या पडद्यावरील त्यांच्या पदार्पणाला लोकांनकडून पसंती मिळाली होती. पाहूया, असेच काही कलाकार आणि त्यांचे सुपरहिट शो.

अमिताभ बच्चन – कौन बनेगा करोडपती

सलमान खान – बीग बॉस, दस का दम

अनिल कपूर – 24

अक्षय कुमार – खत्रों के खिलाडी

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -