घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधान परिषद निकाल - २०१८

महाराष्ट्र विधान परिषद निकाल – २०१८

Subscribe

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राज्यातील सहा जागांचे निकाल आज जाहीर झालेत. आतापर्यंतच्या निकालानुसार वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचा झेंडा रोवला गेला, तर नाशिक आणि परभणीसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकावला. कोकणात राष्ट्रवादीचा उमेदवाराला यश मिळाले तर काँग्रेसच्या पदरात भोपळा पडला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी आज 24 मे रोजी राज्यभरात पार पडली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत भाजपला यश
भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर हे ५२८ मते घेऊन विजयी झाले असून, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचा झेंडा रोवला गेला. या निवडणुकीत एकूण १०५९ मतदारांपैकी १०५६ मतदारांनी आपला हक्क बजावला. या मतदारसंघात अंतिम चार उमेदवारांमध्ये काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ, अपक्ष सौरभ तिमांडे, जगदीश टावरी, भाजपचे रामदास आंबटकर रिंगणात उतरले होते. भाजपचे आंबटकर व काँग्रेसचे सराफ यांच्यात थेट लढत झाली. आंबटकर यांना ५२८ मते तर सराफ यांना ४९१ मते पडली. अपक्ष उमेदवार निवडणुकीत शून्यावरच राहिले. आंबटकर हे ३७ मतांनी विजयी झाले..

- Advertisement -

कोकण विभागात राष्ट्रवादीला यश
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना यश आले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे ३१४ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अॅड राजीव साबळे यांचा पराभव केला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात आज सकाळी ९ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. शिवसेना उमेदवार अँड. राजीव साबळे की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोकण विधान परिषद निवडणुकीत भाजपने उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ दिल्याचे रायगडमध्ये पाहायला मिळाले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे शेकाप, काँग्रेस आणि महत्वाचे म्हणजे खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष उभा होता. तर दुस-या बाजूला शिवसेना मात्र एकाकी पडली. निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना ६२० मते मिळाली तर राजीव साबळे यांना ३०६ मते पडली. अनिकेत तटकरे ३१४ मतानी विजयी झाले असून, यामध्ये १२ मते बाद ठरली.

परभणी-हिंगोलीत शिवसेनेचा झेंडा
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आज सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. यामध्ये टेबल व फेरीनिहाय मतमोजणी करण्यात आली. शिवसेनेचे विप्लव गोपीकिशन बाजोरीया यांना २५६ मते पडून ते विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत एकूण ९९.६० टक्के मतदान झाले. तर आज मतमोजणीत काँग्रेस पक्षाचे सुरेश सखाबापू देशमुख यांना २२१ तर भाजपाचे सुरेश कुंडलीकराव नागरे यांना ४ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ४८१ मते वैध तर १६ मते अवैध ठरली आहेत. मतदारांनी या निवडणुकीत मतदान करतेवेळी एकूण २ मते नोटाला दिली. या निवडणुकीत निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती एम.एन.केरकेट्टा यांनी तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी काम पाहिले.

- Advertisement -

नाशिकमध्ये सेना-
विधान परिषदेसाठी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे ३९९ मतांनी विजय ठरले तर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना ३२१ मते पडली यातील १३ मते बाद ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -