घरताज्या घडामोडीऐश्वर्याच्या ड्युप्लिकेटला पाहिलंत का? नेटकऱ्यांना लागलयं तिचं वेड

ऐश्वर्याच्या ड्युप्लिकेटला पाहिलंत का? नेटकऱ्यांना लागलयं तिचं वेड

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ऐश्वर्या राय बच्चनचा जगभरात चाहता वर्ग आहे. १९९४मध्ये ऐश्वर्या रायने विश्व सुंदरीचा किताब जिंकला होता आणि जगभरात देशाचे नाव रोशन केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आपल्या शानदार अदाकारीसोबत ‘ताल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’ आणि ‘गुरु’ सारख्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते. सध्या ऐश्वर्याच्या ड्युप्लिकेटची चांगलीच चर्चा सुरू आहे. जिचे नाव आशिता सिंह असे आहे. ती हुबेहुबे ऐश्वर्या रायसारखी दिसते. इन्स्टाग्रामवर ती सतत व्हिडिओ शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashita Singh (@aashitarathore)

आशिता सिंहचे इन्स्टाग्रामचे २८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने प्रोफाईलमध्ये स्वतः कलाकार असल्याचे सांगितले आहे. आशिता इंदौरमधील राहणारी असून तिचे व्हिडिओ सोशल मीडिया युझर्सना खूप आवडतात. ती सतत आपला डान्स आणि एक्स्प्रेशनचे व्हिडिओ इन्स्टाग्रावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashita Singh (@aashitarathore)

- Advertisement -

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘पोन्नियिन सेलवन’मधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मणिरत्नम हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ‘पोन्नियिन सेलवन’ या दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ३० सप्टेंबरला तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – Pushpa 2: ‘पुष्पा २’ची जोरदार तयारी सुरू, बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री दिसणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -