घरमनोरंजनतुझी दिशा.... अक्षयने दिला टायगरला खास सल्ला

तुझी दिशा…. अक्षयने दिला टायगरला खास सल्ला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये अक्षय कुमारने टायगर श्रॉफला एक खास सल्ला देताना दिसत आहे जो ऐकून सर्वजण मोठमोठ्याने हसतात.

अक्षयने दिला टायगरला खास सल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात सुरुवातील अक्षय आणि चित्रपटाची टीम चित्रपटाबाबत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं देते. त्यानंतर अक्षय आणि टायगरला प्रश्न विचारण्यात आला की, ते एकमेकांना काय सल्ला देतील. यावर टायगर श्रॉफ म्हणाला की, अक्षयला मी कोणताच सल्ला देण्यास पात्र नाही. त्यांच्यामध्ये काहीच कमी किंवा जास्त नाही. ते परफेक्ट आहेत. ते या वयातही आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देतात.

- Advertisement -

त्यानंतर अक्षयला टायगरला काय सल्ला देणार असं विचारल्यावर तो म्हणाला की, मला टायगरला फक्त ऐवढच सांगायचंय की, नेहमी एकाच दिशेला ‘दिशा’ रहा. अक्षयचा हा सल्ला ऐकून स्टेजवरील सर्व कलाकार तसेच प्रेक्षकही मोठमोठ्या हसू लागले. तर चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी टायगरला मिठी मारली. त्यानंतर अक्षय देखील हसत हसत टायगरला मिठी मारली.

या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा : Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणी दोषी; अभिनेत्री मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -