घरक्राइमPune Police : केमिकल ताडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा;...

Pune Police : केमिकल ताडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा; दोघांना अटक

Subscribe

मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीसोबत ड्रग्जचा विळखाही वाढतो आहे. या वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीसोबत ड्रग्जचा विळखाही वाढतो आहे. या वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून पुणे पोलिसांनी तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल) जप्त केले असून त्याची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. (Pune Crime big action of pune police a chloral hydrate factory used to manufacture chemical tadi was destroyed in sangamner)

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना पुणे पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. या कारखान्यात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारा केमिकलचा पुरवठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश विलास बांगर (40) आणि प्रल्हाद रंगनाथ भंडारी (61) यांना अटक करण्यात आली आहे. प्रल्हाद रंगनाथ भंडारी याच्या कडे विषारी बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेडचा साठा सापडला. त्याची चौकशी केली असता. हा माल त्याला आरोपी नीलेश बांगरने पुरवल्याचे तपासात पुढे आले.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश विलास बांगर हा आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील कुरकुटे मळा, मंचर येथे राहणारा रहिवाशी आहे. तसेच, प्रल्हाद रंगनाथ भंडारी हा मुंढव्यातील केशवनगर येथे राहणारा रहिवाशी आहे. पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार, पुणे पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकी येथील त्याच्या घरावर छापा टाकून केमिकलचे 142 किलो 750 ग्रॅम वजनाचे 5 पोते असा 2 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील सांगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने केमिकल विषारी ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू केल्याचे समजले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तसेच, तब्बल 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणी दोषी; अभिनेत्री मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -