घरमनोरंजनअक्षयने नाकारले 'हे' ३ नवीन चित्रपट !

अक्षयने नाकारले ‘हे’ ३ नवीन चित्रपट !

Subscribe

कमी 'मानधन' देऊ केल्यामुळे अक्षयने हे चित्रपट नाकारले, अशाप्रकारच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. गोल्ड चित्रपटाच्या ट्रेलरमधून अक्षयच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. आपल्या प्रत्येकच चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि दर्जेदार देणारा अक्षय कुमार ‘गोल्ड’मध्येही आपली छाप पाडणार यात काहीच शंका नाही. मात्र, सध्या बॉलीवूडचा हा खिलाडी कुमार एका वेगळ्या मुद्द्यावरुनही चर्चेत आहे. अक्षयने एकाचवेळी ३ नवीन चित्रपट नाकारल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगते आहे. गोल्ड चित्रपटामुळे उत्सुक असलेले अक्षयचे चाहते या बातमीमुळे नक्कीच नाराज झाले असणार.

‘या’ ३ चित्रपटांना रामराम

‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातून अक्षयने एक्झिट घेतल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट झालं होतं, ‘हेरा फेरी ३’च्या पोस्टर लाँचिंगच्यावेळी अक्षयच्या अनुपस्थित राहण्याने या बातमीची पुष्टी केली होती. एका मुलाखती दरम्यानही त्याने आपण या चित्रपटात नसल्याचं स्वत: सांगितलं होतं. मात्र, यापाठोपाठ आता त्याने दोन नव्या चित्रपटांना रामराम ठोकल्याचंही समजतंय. ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटाचा सिक्वेल आणि ‘वेलकम ३’ हे दोन चित्रपट अक्षयने नाकारल्याची चर्चा आहे. एकाचवेळी तीन-तीन चित्रपट सोडण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे मात्र समोर आलं नाहीये. तर दुसरीकडे ‘मानधन’ कमी असल्यामुळे अक्षयने ही प्रोजेक्ट्स नाकारल्याच्या चर्चाही रंगत आहेत. दरम्यान अक्षयचा बहुचर्चित ‘गोल्ड’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

- Advertisement -

अक्षयचा ‘बायोपिक’ येणार ?

एका मुलाखतीदरम्यान बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला ‘तुझ्या जीवनावर आधारीत बायोपिक बनवायला तुला आवडेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, ‘माझ्या जीवनावर आधारीत बायोपिक काढायला मी मूर्ख नाही. या जगात प्रामुख्याने आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या कथा तुम्हाला, मला प्रेरीत करतात. अशा लोकांच्या जीवनावर आधारीत बायोपिक करायला मला नेहमीच आवडेल. ‘तपन दास’ किंवा ‘अरुणाचलम मुरुगनंथम’ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. हे लोक त्यांच्या कामाद्वारे मोठे झाले आहेत. हे लोक सामाजासाठी आणि देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, अशा लोकांचे बायोपिक करायला मला आवडतील’.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -