घरमनोरंजन'रक्षाबंधन'च्या प्रमोशनदरम्यान पुण्यामध्ये अक्षयने घेतला पुणेरी मिसळीचा आस्वाद; पोस्ट शेअर करत केलं...

‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनदरम्यान पुण्यामध्ये अक्षयने घेतला पुणेरी मिसळीचा आस्वाद; पोस्ट शेअर करत केलं कौतुक

Subscribe

प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार पुण्यातील एका -प्रसिद्ध मिसळीच्या हॉटेलात गेला होता. यावेळी त्याने मिसळ, थालीपीठाचा आस्वाद घेतला. शिवाय या मिसळीचं कौतुक करत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा लिहिली.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच अक्षय कुमार त्याच्या रक्षाबंधन चित्रपटातील स्टार कास्टसोबत प्रमोशनसाठी पुण्यामध्ये गेला होता यावेळी त्याने पुणेरी मिसळीचा आस्वाद घेतला. अक्षयने यादरम्यानचे फोटो आणि एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

पुण्यामध्ये घेतला मिसळ-पावचा आस्वाद

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार पुण्यातील एका -प्रसिद्ध मिसळीच्या हॉटेलात गेला होता. यावेळी त्याने मिसळ, थालीपीठाचा आस्वाद घेतला. शिवाय या मिसळीचं कौतुक करत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा लिहिली. मिसळ आणि थालीपीठ खातानाचा एक फोटो शेअर करत अक्षयने लिहिलंय की, ‘प्रत्येक पुणेकरांचा जीव कि प्राण आणि शान असलेला मिसळ पाव.. अशी मिसळ देऊन आमचं पोस्ट आणि मन संतृत्प केल्याबद्दल खूप खूप आभार.. खूप छान.’

चिमणी उड…कबूतर उड…खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

अक्षय कुमारने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो आणि त्याचे सह कलाकार खूप मजामस्ती करताना दिसत आहेत आणि सोबतच चिमणी उड…कबूतर उड…हा लहानपणीचा खेळ खेळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, जो खेळ बहिणीसोबत लहानपणीचे खेळ खेळण्यात आहे, त्याची तुलना नाही. माझ्या ऑनस्क्रिन बहिणींसोबत माझ्या लहानपणीचे दिवस परत जगत आहे.

अक्षय कुमार आणि आमिर खानमध्ये होणार टक्कर
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे, शिवाय याचं दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षक नक्की कोणता चित्रपट पाहणं पसंत करतील याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


हेही वाचा : लंडनहून येताना ‘या’ दोन गोष्टी नक्की घेऊन या’, प्रसाद ओककडे चाहत्याने केली भन्नाट मागणी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -