बिग बींच्या मनात कोरोनाची भीती, म्हणाले, ‘मला दुसरा जॉब द्या!’

amitabh bachchan

नुकतीच कोरोनावर मात करून शहेनशहा अमिताभ बच्चन घरी परतले आहेत. नानावटी रूग्णालयात २३ दिवस उपचार घेतल्या नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण बीग बी यांच्या मनातील कोरोनाची भीती आजही गेली नाही असच दिसतय. कारण सरकारच्या नियमामुळे बिग बी अस्वस्थ झाले आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग, ट्विट, इन्स्टाग्राम, फोटो, व्हिडीओ अशा माध्यमांद्वारे ते कामय आपले विचार मांडत असतात. यावेळी बिग बींनी एका ऑनलाईन ब्लॉगच्या माध्यमातून कोरोनाबाबत आपली भीती व्यक्त केली आहे.

६५ वर्षांवरील कलाकारांना सरकारने चित्रीकरणास मनाई केली आहे. या सरकारी नियमाच्या भीतीमुळे अमिताभ अस्वस्थ आहेत. ६५ वर्षांवरील कलाकारांना कामासाठी आता घराबाहेर पडता येत नाही. मला दुसरं कुठलं काम मिळेल का? असा प्रश्न त्यांनी आपल्या चाहत्यांना विचारला आहे.

बिग बी म्हणातात…

सध्या सर्वच जण कोरोनमुळे त्रस्त आहेत. सरकार, डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ज्ञ आपापल्यापरीने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्यासारख्या ६५ वर्षांवरील मंडळींसाठी अत्यंत भीतीदायक परिस्थिती आहे.  आम्ही आता मुक्तपणे बाहेर फिरू शकत नाही. कोर्टाने परवानगी दिली असली तरी ते स्वातंत्र्य अनुभवता येणार नाही. त्यामुळे माझ्यासाठी कुठला दुसरा जॉब असेल तर सांगा.

पण बिग बींनी केलेल्या या विधानामुळे चाहत्यांना मात्र चांगलच आश्चर्य वाटलं आहे.