घरमनोरंजन...म्हणून बिग बींनी 'ब्लॅक' चित्रपटाचे मानधन नाकारले

…म्हणून बिग बींनी ‘ब्लॅक’ चित्रपटाचे मानधन नाकारले

Subscribe

बॉलिवूड शेहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘चेहरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बिग बींनी मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी कोणतंही मानधन स्वीकारले नाही. या चित्रपटाच्या कथेने प्रभावीत होत बिग बींनी मानधन न घेता हा चित्रपट पूर्ण केला. ते इतक्यावर थांबले नाहीत तर चित्रपटाच्या शुटिंगसाठी पोलंडला स्वखर्चाने गेले. मानधन न घेतला अमिताभ बच्चन यांनी केलेला हा पहिलाच चित्रपट नाही. यापूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी देखील बिग बींनी कोणतंही मानधन घेतले नव्हते.

‘ब्लॅक’ चित्रपटात बिग बींना एका मूक-बधिर मुलीच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. यात मूक-बधीर मुलीची भूमिका अभिनेत्री राणी मुखर्जीने केली होती. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचा राष्ट्रीय पुरस्कारने गौरव करण्यात आला. या चित्रपटाचे मानधन नाकारण्यामागे बिग बींचे एकमेव कारण होते ते म्हणजे संजय लीला भन्साळी. अमिताभ बच्चन संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट पाहून खूप प्रभावी झाले होते. त्यांना संजय यांच्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती. या इच्छेमुळे त्यांनी या चित्रपटासाठीचे कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला. याबाबतचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनीच केला होता.

- Advertisement -

‘ब्लॅक’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “संजय लीला भन्साळी यांचे काम पाहून मी इतका प्रभावित झालो की मला त्यांच्यासोबत काम तीव्र इच्छा झाली. जेव्हा मला त्यांनी संधी दिली तेव्हा मी कोणतंही मानधन स्वीकारले नाही. या चित्रपटाचा भाग असण माझ्यासाठी सर्वकाही होतं. चित्रपटाच्या प्रीमियर दिवशी हा चित्रपट पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. याशिवाय प्रेक्षकांच्या रांगेत दिलीप कुमार बसले होते. त्यामुळे माझ्यासाठी बालपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे वाटले.”


नुसरत जहाँ मुलाला पित्याचे नाव न देता बनणार ‘सिंगल मदर’


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -