घरमनोरंजनबिग बींचे पत्र वाचून नीना गुप्ता झाल्या भावुक

बिग बींचे पत्र वाचून नीना गुप्ता झाल्या भावुक

Subscribe

'बधाई हो' चित्रपटामध्ये दमदार भूमिका करणाऱ्या नीना गुप्ता यांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहिले. या पत्रातून त्यांच्या अभिनयाची स्तुती करण्यात आली. पत्र वाचून नीनाही झाल्या भावुक.

प्रत्येक कलाकाराला आपण केलेल्या अभिनयाची पोच पावती मिळालेली आवडते. आणि ती स्तुती जर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करत असतील तर कलाकारासाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे. नुकताच प्रकाशित झालेला ‘बधाई हो’ या चित्रपटात नीना गुप्ता यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी कौतूक केलं आहे. बच्चन यांनी नीना गुप्ता यांना पत्र लिहिलं आहे. नीना यांनी पत्राचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच बरोबर त्यांनी बिग बींचे आभार मानले आहेत. आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव यांनी चित्रपटात मुख्य भुमिका केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूपरहिट ठरला. दमदार कथनकाच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  १०० कोटींहून अधिक कामाई केली.

नीनाची भुमिका  

या चित्रपटात नीनाने एका ५० वर्षीय महिलेची भूमिका साकारली आहे. चित्रपटात नीना गरोदर असल्याचे दाखवले आहे. चित्रपटात नीनाचे नाव प्रियंवदा कौशिकी आहे. जीतेंद्र आणि प्रियवंदा हे एकमेकांवर खूप प्रेम करत असल्याचे चित्रपटात दाखवले आहे. साधारण याच कथनावर चित्रपट आधरित आहे.

 

View this post on Instagram

 

Aapse ye patr aur pushp pa ke ankhen khushi se bhar aaeen thank u so much @amitabhbachchan sir #BadhaaiHo

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

- Advertisement -

काय म्हणाल्या नीना

“तुमच्याकडून पत्र आणि पुष्पगुच्छ मिळाला म्हणून मला आनंद झाला आहे. माझे डोळ्यात आनंदाश्रू आलेत. धन्यवाद अमिताभ सर.” – नीना गुप्ता, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -