Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Big B म्हणाले, माझे वैवाहिक जीवन संकटात! KBC13 च्या मंचावर खुलासा

Big B म्हणाले, माझे वैवाहिक जीवन संकटात! KBC13 च्या मंचावर खुलासा

अमिताभ बच्चन यांनी ब्रेक घेतला. ब्रेक दरम्यान एक महिला फॅन बिग बींना फ्लाईंग किस देत होती.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)मधील दिगज्ज अभिनेते अमिताभ बच्चन(amitabh bachchan )आणि जया बच्चन(jaya bachchan) यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठाऊक आहे. माहितीनुसार, जया बच्चन कॉलेजच्या दिवसापासून अमिताभ बच्चन यांना पसंत करत असे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 1972 साली रिलीज झालेला चित्रपट ‘बंसी बिरजू’ मध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र झळकले होते. जंजीर,शोले,चुपके चुपके,अभिमान सारख्या हिट चित्रपटात दोघांनी काम केलं आहे. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संकट आलं आहे. असं वक्तव्य केलंय.(amitabh bachchan says his marriage will be in trouble)

नेमकं काय आहे प्रकरण?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो कौन बनेगा करोडपतीचा(KBC13) तेराव्या सिझनच्या होस्टींगमध्ये सध्या बिग बी व्यस्त आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन एका स्पर्धकाला प्रश्न विचारण्या व्यतीरिक्त अनेक मनोरंजक गप्पा गोष्टी करताना दिसतात. पण गुरुवारच्या भागात शूटिंगदरम्यान कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांच्या रांगेत बसलेली एक महिला फॅनकडून बिग बींना प्रचंड अटेंन्शन मिळत होते.

सेटवर काय घडलं-
- Advertisement -

महिला फॅन वांरवार अमिताभ बच्चन यांना फ्लाइंग किस देत होती. यावेळी बिग बी म्हणाले, यामुळे माझ्या संसारात अडचण येऊ शकते. शोमध्ये हॉट सीटवर बसेली स्पर्धक कल्पना दत्ता यांनी 12 लाख 50 हजार रुपयाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी ब्रेक घेतला. ब्रेक दरम्यान एक महिला फॅन बिग बींना फ्लाईंग किस देत होती. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, हे पाहा मॅडम,तुम्हाला आधीच खरं-खरं सांगतो. तुमच्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनात प्रचंड मोठे संकट कोसळले आहे. तुम्ही इतक्या साऱ्या किस पाठवत आहात. अमिताभ बच्चन यांचे उत्तर ऐकून शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व टिममध्ये तसेच स्पर्धक,प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.


हे हि वाचा – Money Heist मधील या भूमिकेशी मिळतो अनन्याचा स्वभाव, अनन्याने केला खुलासा

- Advertisement -