Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सेना-राष्ट्रवादीचा मंत्री सोमय्यांच्या रडारवर, फडणवीसांसोबत केली चर्चा; सोमवारी टाकणार बॉम्ब

सेना-राष्ट्रवादीचा मंत्री सोमय्यांच्या रडारवर, फडणवीसांसोबत केली चर्चा; सोमवारी टाकणार बॉम्ब

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली असून सोमवारी एक बॉम्ब टाकणार आहेत. शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपल्या रडारवर आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमवारी पत्रकरा परिषद घेत दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी सोमवारी दोन नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सांगितलं असलं तरी त्या दोन नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा घोटाळा पुराव्यासह सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत उघड करणार असल्याचं सांगितलं आहे.

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या पुराव्याचे दोन गठ्ठे

किरीट सोमय्या यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यमध्ये त्यांनी माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

चार दिन की चांदनी, आनंद थोडा दिवस घेऊ द्या

किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरलं. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाही आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील, असं सोमय्या म्हणाले.

 

- Advertisement -