घरमनोरंजनविजय सेतुपति-तापसी पन्नूने शेअर केला 'ऐनाबेले सेतुपति'चा फर्स्ट लूक

विजय सेतुपति-तापसी पन्नूने शेअर केला ‘ऐनाबेले सेतुपति’चा फर्स्ट लूक

Subscribe

'ऐनाबेले सेतुपतिचा' फर्स्ट लूक पोस्ट करत तापसीने लिहले आहे की, "कारण कधीकधी एक जीवन सर्वकाही पाहण्यासाठी पुरेसे नसते."

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती(vijay sethupathi) आणि तापसी पन्नू (taapsee pannu )यांचा आगामी सिनेमा ‘एनाबेले सेतुपति’चा (annabelle sethupathi )फर्स्ट लूक रिवील केला आहे. हा सिनेमा एक हॉरर कॅमेडी असून या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक सुंदरराजन यांनी केलं आहे. या पोस्टरमध्ये विजय आणि तापसी यांचा आगळा वेगळा लूक दिसून येत आहे. विजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत लिहलं आहे की, ‘हा आहे ‘ऐनाबेले सेतुपतिचा’ फर्स्ट लूक.’ तापसीने लिहले आहे की, “कारण कधीकधी एक जीवन सर्वकाही पाहण्यासाठी पुरेसे नसते.”(taapsee pannu and vijay sethupathi starrer annabelle sethupathi first look)

‘ऐनाबेले सेतुपति’ मध्ये तापसी विजयसह राधिका सरथकुमार आणि राजेंद्र प्रसाद यांची वर्णी लागली आहे. सिनेमाचं संपुर्ण शूटींग जयपुरमध्ये झालं असून सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. तसेच येत्या 17 स्पटेंबरला सिनेमा हिंदी तमिल,तेलगु,कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. सिनेमाचं नाव हिंदी मध्ये’ ऐनाबेले राठौर’ ठेवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)तिच्या चित्रपटातून नेहमीच काही तरी हटके तसेच नावीन्यपुर्ण विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तापसी बॉलिवूड इिंडस्ट्रीमधील अत्यंत उत्तम कलाकार असून गेल्या एक दशकापेक्षा जास्त भारतीय सिनेमात तापसीने आपले योगदान दिले आहे. तापसीच्या आगामी सिनेमाविषयी सांगायचे झाल्यास ब्लर, शाबास मितू, सारख्या सिनेमात तापसी झळकणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – शिल्पा शेट्टीने चूक कबूल केली म्हणाली,मी चूकी केली पण…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -