घरमनोरंजनन्यूड फोटोप्रकरणी रणवीर सिंहविरोधात एका स्वयंसेवी संस्थेची चेंबूर पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

न्यूड फोटोप्रकरणी रणवीर सिंहविरोधात एका स्वयंसेवी संस्थेची चेंबूर पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

Subscribe

रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावण्यात आले आहेत.

रणवीरने एका प्रसिद्ध मॅगजीनसाठी हे फोटोशूट केलं होतं काही फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे कपड्यांशिवाय असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये रणवीरने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :रणवीरबद्दल काहीही वाईट बोलायला आणि ऐकायला आवडत नाही…रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटला आलियाचं समर्थन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -