घरराजकारण...लगेच बाळासाहेब आठवले, राणे बंधूंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

…लगेच बाळासाहेब आठवले, राणे बंधूंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यापाठोपाठ भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी शनिवारी ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीला दिलेल्या सडेतोड मुलाखतीत, ‘सगळ्या महाराष्ट्रापेक्षा उद्धव ठाकरेंना मी जास्त ओळखतो. तो माणूस विश्वास ठेवण्याजोगा नाही, असे म्हटले आहे. तसेच आताच्या शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारही नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या मागणीविरोधात आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात

- Advertisement -

राज्यात शिवसेना नक्की कोणाची यावरून संघर्ष रंगलेला असतानाच, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेलो असतो तर काय झालं असते, या प्रश्नापासून मुंबईचा घात करण्याच्या योजना तसेच फुटिरांना गद्दार म्हणण्यापर्यंतच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली आहेत.

दोन भागांमधील ही मुलाखत मंगळवार आणि बुधवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याचे टीझर आणि फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंवरून निलेश आणि नितेश या राणे बंधूंनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या दोन मुलाखतींचे फोटो शेअर करताना ‘सत्ता असताना बाळासाहेब नाही आठवले, सत्ता गेले की लगेच बाळासाहेब आठवले’ अशी टिप्पणी त्यावर दोघांनी केली आहे.

हेही वाचा –

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -