घरमनोरंजनकिरण खेर प्रकृतीबाबत अनुपम खेर यांनी दिली माहिती

किरण खेर प्रकृतीबाबत अनुपम खेर यांनी दिली माहिती

Subscribe

नुपम खेर पुढे म्हणाले की कित्येकदा किरण खूप सकारत्म्क दिसून येते आणि अनेकदा किमोथेरेपीमुळे तिला खूप त्रास होतो. पण तरीही ती स्वत: ला सांभाळते अशा वेळेस कॅन्सर रुग्णाकडे विशेष लक्ष  द्यावे लागते आम्ही सगळे तिच्या सोबत आहोत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर (Kirron kher) यांना काही दिवसांपूर्वी ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला. तसेच त्यानंतर किरणच्या निधनाच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या मात्र या अफवांवर पूर्णविराम देत किरण खेर यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी किरण यांच्या प्रकृतीबद्दल प्रतिक्रिया दिली दिली होती. अनुपम खेर यांनी पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. अनुपम खेर यांनी किरण पूर्णपणे स्वस्थ असल्याचे संगितले आहे. बॉलिवूडमध्येही ही आजाराची बातमी वाऱ्यासारखी पसरु लागली. बॉलिवूड कलाकारांसह अनेक चाहते आता किरण खेर लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. याचदरम्यान आता अनुपम खेर यांनी किरण याच्या पकृतीसंदर्भात अपडेट दिली आहे. नुकतच दिलेल्या मुलाखती दरम्यान अनुपम यांनी किरण याच्या तब्येतीत सुधार होत आहे असे संगितले तसेच याचा इलाज कठीण आहे. ती नेहमी बोलते की करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सर्व परिस्थिती बदलत आहे. कॅन्सर पासून पीडित असणारे रुग्ण त्यांचे लक्ष इतर कुठेही लागू शकत नाही. कुठेही बाहेर जाऊ शकत नाही कोणालाही भेटू शकत नाही यामुळे जास्त स्थिती बिघडत आहे . अनुपम खेर पुढे म्हणाले की कित्येकदा किरण खूप सकारत्म्क दिसून येते आणि अनेकदा किमोथेरेपीमुळे तिला खूप त्रास होतो. पण तरीही ती स्वत: ला सांभाळते अशा वेळेस कॅन्सर रुग्णाकडे विशेष लक्ष  द्यावे लागते आम्ही सगळे तिच्या सोबत आहोत. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

- Advertisement -

किरण खेर यांना कॅन्सर चे निदान होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्या अनुपम खेर यांच्यासोबत करोना लस घेण्याकरिता घराबाहेर पडली होती.


हे हि वाचा – कोरोनाबधित रुग्णांकरिता रॅपर डिवाइन करणार डिजिटल लाईव्ह शोद्वारे आर्थिक मदत!!

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -