Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन रिमिक्सपेक्षा मूळ गाण्यांना प्राधान्य... 'आज फिर तुम पे' गाण्याबाबत अनुराधा पौडवाल यांचे स्पष्टीकरण

रिमिक्सपेक्षा मूळ गाण्यांना प्राधान्य… ‘आज फिर तुम पे’ गाण्याबाबत अनुराधा पौडवाल यांचे स्पष्टीकरण

Subscribe

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटातून गायिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनुराधा पौडवाल यांनी गायक अरिजित सिंहच्या ‘आज फिर तुम पे’ या गाण्यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. ज्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, हे गाणं ऐकून त्यांना खूप रडावेसे वाटले. ज्यावरुन सोशल मीडियावर अनेक चर्चा होऊ लागल्या. दरम्यान, अशातच आता या चर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

अनुराधा पौडवाल यांची पोस्ट चर्चेत

गायिका अनुराधा पौडवाल यांनी या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलंय की, “माझ्या हितचिंतकांना आणि मीडिया इंडस्ट्रीतील माझ्या चाहत्यांसाठी. नुकतीच मी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यादरम्यान, त्यांनी मला मी कोणत्याप्रकारचे संगीत ऐकते असं विचारलं. मी नेहमीच रिमिक्सपेक्षा मूळ गाण्यांना प्राधान्य दिले आहे. ‘आज फिर तुम पे’ या गाण्याबद्दलची माझी टिप्पणी रिमिक्सबद्दल होती, गायकाबद्दल नाही. रिमिक्सने मूळ गाण्याला न्याय दिला पाहिजे. 90 च्या दशकातील अनेक गाणी पुन्हा तयार केली गेली आहेत, परंतु ती मूळ गाण्यांना न्याय देत नाहीत. आम्ही संगीतकाराला श्रद्धांजली देखील वाहिली आहे, परंतु ते सभ्य पद्धतीने केले गेले.”

- Advertisement -

पुढे त्या म्हणाल्या की, “मी आदरणीय माध्यमांना विनंती करेन की अशी विधाने खळबळजनक करू नयेत. जगात पुरेसे बोलणे नाही का?”

दरम्यान, ‘आज फिर तुम पे’ हे मूळ गाणं पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. जे ‘दयावान’ चित्रपटातील आहे. त्यानंतर आता ‘हेट स्टोरी 2’ साठी या गाण्याला रिक्रिएट करण्यात आलं जे अरिजीत सिंहने गायले आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या ‘जय श्री राम’ गाण्याचा रेकॉर्ड; 24 तासांत करोडो व्ह्यूज

- Advertisment -