Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Arijit Singh Birthday: एकेकाळी रियालिटी शो मधून बाहेर पडावं लागलं, या गाण्यानंतर...

Arijit Singh Birthday: एकेकाळी रियालिटी शो मधून बाहेर पडावं लागलं, या गाण्यानंतर चमकले अरिजीत सिंगचे नशीब

नुकतच प्रदर्शित झालेला चित्रपट 'पगलैट' मध्ये त्याने संगीतकाराच्या रूपात पदार्पण केलं आहे.

Related Story

- Advertisement -

अरिजीत सिंग नाव घेतलं की कानावर आपसूकच रोमॅंटिक गाण्याचा सूर  वाजू लागतो. भल्या भल्या लोकांना आपल्या मधुर आवाजाच्या गायनाने डोळ्यात टचकन पाणी आणण्याचे काम अरिजीत सिंगच्या गायकीत आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. आज भलेही अरिजीत लोकांच्या मनात राज्य करतो पण त्याचा सुपरस्टार बणण्याचा प्रवास काही सोप्पा न्हवता.अनेक कठीण संघर्षाना पार करून अरिजीतने आपले स्वतंत्र स्थान बॉलिवूड मध्ये बनवले आहे. आज २५ एप्रिल रोजी अरिजीत सिंगचा वाढदिवस आहे. त्याच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

- Advertisement -

अरिजीतला बालपणा पासूनच संगीताच बाळकडू मिळाले आहे. त्याची आई गायिका होती तसेच मामा एक तबला वादक होते. अरिजीतच्या आज्जीला सुद्धा भारतीय संस्कृतिक संगीतात रुचि होती. घरातील संगीत वारसा नंतर अरिजीतने पुढे संगीत क्षेत्रात करियर करण्याचं निश्चय केला . सुरुवातीच्या काळात त्याला अनेक नकराला समोर जावं लागलं. सिंगिंग रियालिटी शो ‘गुरुकुल’ मधून त्याला पहिल्यांदा वेळेस नकाराचा सामना करावा लागला. यानंतर ‘सावरिया’ चित्रपटासाठी गायलेल गाण एन मोक्यावर काढून टाकण्यात आलं तसेच टिप्स म्यूजिकने अरिजीतच म्यूजिक अल्बम रेकॉर्ड केलं होतं आणि ते सुद्धा कधीच रिलीज करण्यात आलं नाही.गुरू राजेंद्र प्रसाद हजारी यांच्या बोलण्या वरुण अरिजीतने म्यूजिक रियलिटी शो ‘फेम गुरुकुल’ मध्ये सहभाग घेतला होता. शो दरम्यान अनेकांना अरिजीतने त्याच्या गायनाने प्रभावित केलं होतं. त्याच्या कलेची प्रशंशा देखील केली जात होती. पण अरिजीत टॉप 5 पर्यंतच आपली जागा शो मध्ये बनवू शकला. यानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी अरिजीतला ‘हाय स्कूल म्युजिकल 2’ च्या चित्रपटा मध्ये एक गाण गाण्याची संधी दिली.

अरिजीतने हार न मानता आपली वाटचाल पुढे चालू ठेवली . अशातच अरिजीत बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधि शोधत होता. तेव्हा त्याला ‘आशिकी 2’ या चित्रपटामध्ये गाण गाण्याची संधी प्राप्त झाली आणि या संधीच सोन करत अरिजीतच ‘तुम ही हो’ हे गाण सुपर दुपार चार्ट बस्टर झालं. या गाण्याने अरिजीतला रातोरात स्टार बनवून टाकलं . बॉलिवूड चे दरवाजे आता अरिजीत साथी खुळू लागले अनेक गाण्यांच्या ऑफर त्याच्याकडे येऊ लागल्या. ‘तुम ही हो’ या गाण्या नंतर अरिजीत ने हिट गाण्यांची लाइनच लावली. ‘फिर भी तुमको चाहूंगा’, ‘पछताओगे’, ‘पल’, ‘खैरियत’, ‘सोच ना सके’, ‘इलाही’, ‘हमारी अधूरी कहानी’ या गाण्यांना चाहत्यांनी खूप पसंती मिळाली.सध्या अरिजीत गायकी सोबतच संगीतकार सुद्धा बनला आहे. नुकतच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पगलैट’ मध्ये त्याने संगीतकाराच्या रूपात पदार्पण केलं आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – सलमानच्या ‘राधे’च्या एक आठवडा आधीच शाहरूखचा ‘प्रेमांतूर’ रिलिज होणार

- Advertisement -