घरताज्या घडामोडीआशा भोसले यांचे सुपुत्र आनंद यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

Subscribe

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ दुबईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहितीनुसार, अचानक आशा भोसलें यांचे सुपुत्र आनंद बेशुद्ध झाले आणि ते जमिनीवर कोसळले. ज्यामुळे ते जखमी झालेत आणि त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. जेव्हा आशा भोसले यांचे सुपुत्र बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले, तेव्हा सर्व कुटुंबिय घाबरले. त्यांना काय करायचं हे कळतच नव्हतं. सध्या आशा भोसले आनंद यांच्या जवळ आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. मुंबईत असलेले सर्व लोकं आनंद यांच्या तब्येतीबाबत सतत विचारपूस करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान आशा भोसले यांना तीन मुलं होती. एक मुलगी आणि दोन मुलं होती. सर्वात मोठ्याचं नाव हेमंत होत, तर मुलीचं नाव वर्षा होत. वर्षा यांनी स्पोर्ट्स रायटर हेमंत केंकरेंसोबत लग्न केलं होत, परंतु १९९८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षा मुंबईत आपल्या आईसोबत राहू लागल्या. पण ऑक्टोबर २०१२मध्ये ५६ वर्षांच्या असताना त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. तर सर्वात मोठे पुत्र हेमंत यांचा ६६व्या वर्षीय कॅन्सरमुळे २०१५ साली मृत्यू झाला होता.


हेही वाचा – लग्न होताच रणबीर-आलियाची एकूण संपत्ती झाली ‘इतकी’; दोघांपैकी कोण जास्त कमवतं? जाणून घ्या


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -