घरमनोरंजन‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ

‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ

Subscribe

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक म्हणून आशिष पाटीलला ओळखलं जातं. आजवर त्याने सोनाली कुलकर्णीपासून ते अमृता खानविलकरपर्यंत अशा सगळ्या आघाडीच्या अभिनेत्रींचा नृत्यदिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अलीकडेच ‘चंद्रमुखी’ सिनेमातील ‘बाई गं’ या बैठकीच्या लावणीसाठी त्याने केलेली कोरिओग्राफी प्रेक्षकांचे मन जिंकणारी ठरली. यासाठीच त्याला ‘लावणीकिंग’ म्हणून ओळखलं जातं. आता आशिषने त्याच्या करिअरमध्ये यशाची आणखी एक पायली चढली असून त्याने मुंबईत स्वत:चा स्टुडिओ सुरू केला.

मुंबईतील गोरेगाव याठिकाणी आशिष पाटीलने स्वत:चा डान्स स्टुडिओ सुरू केला असून याठिकाणची वास्तूपूजा अलीकडेच पार पडली. त्याने या स्टुडिओला ‘कलांगण’ असे नाव दिले आहे. यानिमित्त आशिषने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या आयुष्यातील हे यश सर्वांसोबत शेअर केले. ‘कलांगण’च्या वास्तूपूजेसाठी आशिषच्या घरातील सदस्य आणि जवळची मंडळी उपस्थित होती.

- Advertisement -

आशिषही या व्हिडिओमध्ये यथोचित पूजा करताना दिसतो आहे. त्याने असे म्हटले की, ‘मित्रमंडळींनो नमस्कार, ‘वास्तू पूजा’ संपन्न झाल्यानंतर मी अभिमानाने ‘कलांगण’ हा माझा स्वतःचा डान्स स्टुडिओ ऑफिशियल लॉन्च करत असल्याची घोषणा करतो. एक कलाकार म्हणून माझं हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. माझ्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि आनंददायी पाऊल आहे ज्याबद्दल मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे.’

 यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “सर्व प्रकरचे डान्स क्लासेस, रील्स शूटिंग, वर्कशॉप्स आणि सर्व प्रकारच्या रिहर्सलसाठी हे नवीन स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे माझ्या या डान्स स्टुडिओची खास झलक तुम्हा सर्वांबरोबर शेअर करून मी माझा हा आनंद द्विगुणित करत आहे”. तसेच यापुढे त्याने आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे हे सारं काही शक्य झाले असं म्हणत गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आहे.

- Advertisement -

आशिषने ही पोस्ट शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कलाविश्वातील अनेक मंडळींनीही त्याला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक म्हणून आशिष पाटीलला ओळखलं जातं. ‘एका पेक्षा एक’, ‘बुगी वुगी’ यांसारख्या रिअॅलिटी शोपासून सुरुवात करणारा हा तरुण डान्सर आज हिंदी आणि मराठी डान्स विश्वातील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -