Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनKartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! घरी येणार 'लिटिल चॅम्प'

Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! घरी येणार ‘लिटिल चॅम्प’

Subscribe

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड. आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी गायिका कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहता वर्ग आहे. आता लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. लवकरच कार्तिकीच्या घरी छोट्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकताच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला. तिच्या डोहाळे जेवणाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. कार्तिकीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर डोहाळे जेवणाचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण..असं तिनं हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. अनेकांनी फोटोला कमेंट करुन कार्तिकी आणि रोनित पिसे यांना शुभेच्छा दिल्या.

 डोहाळ जेवणासाठी कार्तिने खास लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर फुलांचे दागिने घातले होते. कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ फिल्मवाला या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

कार्तिकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं. सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली होती. कार्तिकी सध्या गायिका म्हणूनआपल्या सर्वांनाच माहीत आहे. कार्तिकीनं ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती.