आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत?

'अनेक' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता आयुष्मान येत्या काळात 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्माते या 'ड्रीम गर्ल'च्या दुसऱ्या सिक्वेलची तयारी करत आहेत

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला हिंदी चित्रुपटसृष्टीतील टॅलेंटेड कलाकरांपैकी एक समजले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी आयुष्मानचा ‘अनेक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. ‘अनेक’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता आयुष्मान येत्या काळात ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे निर्माते या ‘ड्रीम गर्ल’च्या दुसऱ्या सिक्वेलची तयारी करत आहेत, ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटामध्ये सुद्धा आयुष्मान खुरानाच मुख्य भूमिका साकरणार असून या आधीच्या पहिल्या सिक्वेलमध्ये सुद्धा आयुष्मानने काम केले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे निर्माते आयुष्मान सोबत मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. याआधीच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाध्ये आयुष्मान खुराना सोबत नुसरत भरूचे दिसली होती.
सारा अली खानचे नाव चर्चेत
सूत्रांच्या माहितीनुसार, राज शांडिल्य यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटासाठी नेमलेल्या काही अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत, यात अभिनेत्री सारा अली खानचे नाव टॉप चॉइसमध्ये आहे. सूत्रांच्या मते, निर्माते एका अशा तरूण अभिनेत्रीच्या शोधात आहेत, ज्यामध्ये सारा अली खान अगदी योग्य बसते. निर्मात्यांनी याआधीच सारा अली खानशी संपर्क केलेला आहे. मात्र, अजून सारा अली खानने या चित्रपटाबाबत अजून कोणतेही सहमती दर्शवलेली नाही.
सारा अली खान आणि आयुष्मान खुरानाचा पहिला चित्रपट
 ‘ड्रीम गर्ल 2’चे यावर्षीच्या शेवटापर्यंत  शूटिंग सुरू होऊ शकते, मात्र सारा अली खानने या चित्रपटासाठी सहमती दर्शवली तर सारा अली खान आणि आयुष्मान खुरानाचा एकत्र काम केलेला हा पहिला चित्रपट असेल.
सारा अली खान आणि आयुष्मान खुरानाचे इतर प्रोजेक्ट
सध्या आयुष्मान खुराना ‘डॉक्टर जी’ चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाहसोबत दिसणार आहे.तसेच सारा अली खान आता ‘गॅसलाइट’मध्ये विक्की कौशलसोबत दिसणार आहे.


हेही वाचा :रॉकस्टार जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, व्हिडीओ शेअर करत जस्टिनने केला ‘या’ आजाराचा खुलासा