रॉकस्टार जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, व्हिडीओ शेअर करत जस्टिनने केला ‘या’ आजाराचा खुलासा

जस्टिन बीबरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने या व्हिडीओमध्ये रामसे हंट सिंड्रोम नावाच्या या खतरनाक आजाराचे नाव सांगितले आहे

जर तुम्ही सुद्धा हॉलिवूड गाण्याचे चाहते असाल आणि त्यात सुप्रसिद्ध रॉकस्टार जस्टिन बीबरचे मोठ्ठे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण २८ वर्षीय जस्टिन बीबरच्या चेहऱ्यावर पॅरालिसिस अटॅक झालेला आहे. (Paralysed attack on Justin Beiber face) जस्टिन बीबर सध्या एका खतरनाक आजारातून जात आहे. ज्याची माहिती स्वतः त्याने एका व्हिडीओद्वारे दिली असून या खतरनाक आजाराचा खुलासा केला आहे. तसेच त्याने आपल्या चाहत्यांना मला आठवणीत ठेवा असे देखील सांगितले आहे.

जस्टिन बीबरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने या व्हिडीओमध्ये ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाच्या या खतरनाक आजाराचे नाव सांगितले असून वेळेवर या आजाराचे उपचार न केल्यास किती गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात याबाबत देखील माहिती दिली आहे.

‘रामसे हंट सिंड्रोम’ आजाराने त्रस्त आहे जस्टिन बीबर

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

 या व्हिडीओमध्ये आपल्या अवस्थेबाबत सांगताना जस्टिन बीबर सांगत आहे की, “मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे. तुम्ही माझा चेहरा पाहू शकता. मला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) नावाचा आजार झालेला आहे. हा आजार मला एका व्हायरसमुळे झालेला आहे, ज्याने माझ्या  चेहऱ्याच्या नसांवर अटॅक केला आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की माझा एक डोळा उघड झाप करत नाहीए. एका बाजूने मी हसू शकतो मात्र एकाबाजूने माझे नाक सुद्धा हालत नाही”.

100% बरा होऊन परत येईन
जस्टिन बीबरने पुढे सांगितले की, काही चाहते माझे शो कॅन्सल झाल्यामुळे खूप नाराज होते. मी यावेळी कोणताही परफॉर्मन्स करू शकत नाही. कारण ही गोष्ट खूप गंभीर आहे.नशीब असं काही झालं नसते. मात्र मला आता संपूर्ण आरामाची गरज आहे. त्यामुळे मी लवकरच 100% बरा होऊन परत येईन. चाहत्यांनी माझ्यावर नाराज होऊ नये.

 


हेही वाचा :‘वाय’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला