घरमनोरंजनबॉलिवूडमधील कलाकारांवर बाबा रामदेव यांचे 'टीकासन'

बॉलिवूडमधील कलाकारांवर बाबा रामदेव यांचे ‘टीकासन’

Subscribe

बॉलिवूडमधील कलाकारांवर नशा करत असल्याचा आरोप केला. बाबा रामदेव यांनी सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान यांचे नाव घेऊन दिले आहे.

योग गुरु रामदेव बाबा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असतात. नुकताच त्यांनी बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्तेत आले आहेत. खरंतर, रामदेव बाबा उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नशा मुक्त भारत कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्यांनी या ठिकाणी लोकांना नशा न करण्याचे सल्ले दिले. तसेच बॉलिवूडमधील कलाकारांवर नशा करत असल्याचा आरोप केला. बाबा रामदेव यांनी सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान यांचे नाव घेऊन दिले आहे.

बाबा रामदेव म्हणाले बॉलिवूडमध्ये सगळीकडे ड्रग्स
बाबा रामदेव कार्यक्रमाच्या वेळी सांगितले की, “शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज घेत आहे, सलमान ड्रग्ज घेतो. आमीरचं माहित नाही. माहित नाही किती मोठे-मोठे ज्यांना आपण कलाकार म्हणतो. अभिनेत्रींचा तर देवचं मालक आहे. चित्रपटसृष्टीच्या चारी दिशेला ड्रग्ज आहे.” बाबा रामदेव यांनी याआधी देखील बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त भाष्य केलं होतं.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा
बॉलिवूडमध्ये सुशांत सिंह राजपूरच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचे नाव समोर आले होते.

ड्रग्ज प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा
2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईमध्ये एका क्रूजवर होत असलेल्या रेव पार्टीमध्ये सापडला होता. त्यानंतर त्याला एनसीबीने अटक केली होती आणि तुरुंगात देखील टाकले होते. सध्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे आणि सध्या एनसीबीने त्याला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘मिर्झापूर 3’ लवकरच होणार प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -