Tejasswi Prakash च्या ‘बिग बॉस15’ च्या विजेतेपदावरून नवा वाद; ट्विटरवर वॉर सुरु

bigg boss 15 finale users furious on tejasswi prakashs winning trophy trends boycott
Tejasswi Prakash च्या बिग बॉस15 च्या विजेतेपदावरून नवा वाद; ट्विटरवर वॉर सुरु

वाद-विवाद, रुसवे-फुगवे आणि ड्रामानंतर अखेर बिग बॉस 15 ला ‘या’ सीझनचा विनर मिळाला आहे. तेजस्वी प्रकाश हीने यंदा बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकली आहे. तिच्या या विजयावर चाहते खूप खूश आहेत. आपल्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि विचित्र वागण्यामुळे तेजस्वी नेहमी चर्चेत होती. मात्र करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे तिची सर्वाधिक चर्चा झाली. अनेकांनी हा इमोशनल मुद्दा करत दोघांच्या जोडीला ‘तेजारन’ असे नावही दिले. मात्र निरगस वागण्यामुळे ती प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरली. तेजस्वी प्रकाशला ‘बिग बॉस 15’ च्या ट्रॉफीसह, एकूण 40 लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे.

मात्र सोशल मीडियावर तेजस्वीच्या विजयाने काही युजर्स चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्स तेजस्वी आणि बिग बॉस शोविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. काल रात्री तेजस्वी या शोची विजेता म्हणून घोषित होताच ट्विटरवर युजर्सकडून तेजस्वीच्या विरोधात कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.

अनेक युजर्सनी शोमध्ये तेजस्वीचा विजय फिक्स्ड असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी प्रतीक सहजपालला ट्रॉफीचा खरा मानकरी असल्याचे म्हटले आहे. युजर्सनी काय लिहिले ते पहा.

एका यूजरने लिहिले की, ‘नाही, ती विजेतेपदाची खरी मानकरी नाही, ती कलर्सची सून आहे, त्यामुळे तिला विजेता बनवण्यात आले.’

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘कलर्स नेहमीच बायस्ड असतो, मला हे समजत नाही की जेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या कलर्स वाल्या लोकांना जिंकवायचे असते, तेव्हा तुम्ही थेट त्यांनाच ट्रॉफी कुरिअर करावी, उगीच जनतेचा वेळ का वाया घालवता. उमरला मधूनच काढून टाकले आणि आता प्रतीक खरा विजेते पदाचा दावेदार होता.’

एकाने लिहिले, ‘लज्जास्पद आणि निरुपयोगी @itsmetejasswi vamp BB15 चा विजेता बनली.’

यामुळे ट्विटरवर आता (‘TATTI CHANNEL COLORS TV’) टट्टी चॅनेल कलर्स टि.व्ही हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. आतापर्यंत 1.07 मिलीयन वेळा हा हॅशटॉग वापरण्यात आला आहे.

‘हे’ आहेत शोचे टॉप 5 स्पर्धक

तेजस्वीने भलेही बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकली असली तरी प्रतीक सहजपालवर चाहत्यांनी विशेष प्रेम दाखवले. प्रतीक हा शोचा फर्स्ट रनर अप ठरला आहे. करण कुंद्रा हा सेकेंड रनरअप ठरला. त्याचवेळी, शमिता शेट्टी टॉप 4 मध्ये आल्यावर बाद झाली. टॉप 5 मध्ये आल्यानंतर निशांत भट्टने 10 लाख रुपयांची ब्रीफकेस घेऊन स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.


प्रेक्षकांनो, अशा भिकार सीरियल पाहणं बंद करा ; ‘Vikram Gokhale’ यांचं आवाहन