Bigg Boss 15: आज बिग बॉस १५ चा ग्रँड प्रीमियर; कधी, कुठे, कसा पाहता येणार शो!

अखेर आज बिग बॉस १५ ची उत्सुकता संपणार आहे. बिग बॉस ओटीटीनंतर बिग बॉस १५ पुन्हा एकदा धम्माल करण्यासाठी सज्ज झाले आहे. बिग बॉस १५ हा शो २ ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. या शोचा होस्ट नेहमीप्रमाणे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान असल्याने प्रेक्षक हा शो पाहण्यात अत्यंत उत्साही आहे. यापूर्वी, बिग बॉस ओटीटी करण जोहरने होस्ट केले होते, ज्याची विजेती दिव्या अग्रवाल ठरली होती. बिग बॉस ओटीटी संपल्यानंतर आता प्रेक्षक बिग बॉस १५ ची आतुरतेने वाट पाहत होते. नेहमीप्रमाणेच या शोमध्ये ग्लॅमर, संगीत, वादविवाद, प्रेम सगळ्यांचं फ्युजन असणार आहे. तुम्ही देखील हा शो पाहण्यासाठी उत्सुक असाल तर जाणून घ्या कधी, कुठे, कसा पाहता येणार शो…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणारा बिग बॉस १५ चा ग्रँड प्रिमीयर आज शनिवारी रात्री साडे नऊ वाजता होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजपासूनच हा शो कलर्स वाहिनीवर पाहू शकतात. दररोज रात्री साडेदहा वाजता तर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता या शोची मनोरंजनात्मक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय इतर शोप्रमाणे बिग बॉससुद्धा २४ तास VOOT वर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिगबॉस १५ मध्ये नेमके कोणते कलाकार असणार आहे, याची उत्सुकता देखील आज संपणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी या शोच्या स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात आला होता, त्यानुसार आज बिगबॉसच्या घरामध्ये प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, जय भानुशाली , तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अकासा सिंह, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिंबा नागपाल,साहिल श्रॉफ आणि पंजाबी सिंगर अफसाना खान यांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे.