घरमनोरंजनबाप्पासमोर बिग बॉसच्या सदस्यांचा धम्माल डान्स!

बाप्पासमोर बिग बॉसच्या सदस्यांचा धम्माल डान्स!

Subscribe

माधव देवचकेच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नेहा आणि हिना आल्या होत्या. बाप्पाच्या दर्शनानंतर माधवने आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला व्हिडीयो कॉल केला.

बिग बॉस मराठी संपल्यानंतरही माधव देवचके, नेहा शितोळे, हिना पांचाळ, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेने आपली मैत्री जपली आहे. माधव देवचकेच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नेहा आणि हिना आल्या होत्या. बाप्पाच्या दर्शनानंतर माधवने आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला व्हिडीयो कॉल केला आणि मग हिना, माधव, नेहा, आरोह आणि शिवानीच्या बराचवेळ गप्पा रंगल्या. या गप्पांनंतर माधव, हिना आणि नेहाने घरात खूप धमाल केली.

- Advertisement -

अभिनेता माधव देवचकेच्या घरी दरवर्षी गणपती दर्शनाला त्याचे शाळा-कॉलेजपासून ते फिल्म इंडस्ट्रीतले बरेच मित्र-मैत्रिणी येतात. आता यामध्ये हिना,  नेहाचीही भर पडलीय. त्याला बिग बॉसमध्ये मिळालेल्या या दोन मैत्रिणींशी त्याचे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जुळले. त्या तिघांनी एक मस्त डान्सही केला.

- Advertisement -

माधव आणि त्याच्या घरच्यांना भेटून नेहा म्हणाली, “माधवच्या घरी मी पहिल्यांदाच गणपतीसाठी आले आहे. पण माधवच्या घरची मंडळी इतकी गोड आहेत की मला अजिबात असं वाटत नाहीये की मी पहिल्यांदाच त्यांना भेटते आहे. मुंबईतलं माझं घर सोडून आता अजून एक नविन घर मला मिळालय. मी बऱ्याचदा कामानिमीत्त मुंबईत असल्यामुळे घरात गणपती बसवणे खूप मिस करते पण यावर्षीपासून आता माधवच्या घरी गणपती येत असल्याने घरी नसणे मी मिस करणार नाही.”

“बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा कुठल्याच स्पर्धकांशी माझी ओळख नव्हती. पण बिग बॉसच्या घरातून परत आल्यावर बाहेरच्या जगात त्यांच्या बरोबर जगणं खूप वेगळी आणि मस्त फिलींग आहे. बिग बॉसच्या घरामूळे मला खास दोस्त, बेस्ट बडीज मिळाले. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरेबर भांडणं होतात पण बाहेर आल्यावर ते विसरून सगळे पुन्हा खूप छान मित्र होतात.” – हिना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -