घरमहाराष्ट्रनाशिकईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती

Subscribe

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत मतदारांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. गावागावात मतदारांना याबाबत माहीती देण्यासाठी ३० रथ तयार करण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघात दोन रथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहीमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला.

पुढील आठवडयात विधानसभा निवडणुकीची आचारसहींता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारया २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणीही पुर्ण करण्यात आली आता अभिरूप मतदान प्रक्रियेव्दारे राजकिय पक्षांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. लोकसभा निवडणूकीनंतर विरोधकांनी ईव्हीएम विषयी शंका उपस्थित करत ईव्हीएमवर मतदान घेण्यास हरकत नोंदवली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. अनेकदा मतदान केल्यानंतर ते आपण केलेल्या उमेदवाराएवेजी दुसरया उमेदवाराला गेल्याच्या तक्रारी प्राप्त होतात त्यामुळे आता ईव्हीएमवर केलेले मतदान आणि व्हीव्हीपॅटवर दिसणारे मतदान याची खातरजमा व्हावी याकरीता गावागावात याविषयी जनजागृती केली जाणार आहे.

- Advertisement -

याकरीता खास रथ तयार करण्यात आला आहे. यावर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट तसेच मोठी स्क्रिन लावण्यात येणार असून या स्क्रिनवर ईव्हीएम कशा पध्दतीने काम करते तसेच इतरही शंकांचे लघुपटाव्दारे निसरन करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -