घरट्रेंडिंग'कारपेंटर' ते 'थलाईवा', शिवाजी राव गायकवाड यांचा प्रवास

‘कारपेंटर’ ते ‘थलाईवा’, शिवाजी राव गायकवाड यांचा प्रवास

Subscribe

शिवाजी राव गायकवाड नाम तो सुना ही होगा… मराठमोळं नाव असलेले शिवाजीराव गायकवाड आज दाक्षिणात्य सिनेमातील ‘थलईवा’ म्हणजेच परमेश्वर स्वरुप झाले आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. पण शिवाजी ते रजनीकांत हा प्रवासही खूप मोठा आणि कष्टाने भरलेला होता. आज साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या थलईवा रजनीकांत यांच्या खास गोष्टी

जाणून घ्या रजनीकांत यांच्या स्टाईलचे रहस्य 

रजनीकांतचे बालपण

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरुमध्ये झाला. मूळ मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन ठेवले गेले. वडील रामोजीराव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल होते. तर आई जीजाबाई गृहिणी होत्या. बंगळुरुमध्ये जन्म झाला असला तरी रजनीकांत यांच्या घरी मराठी भाषा बोलली जायची तर घराबाहेर कन्नड भाषा बोलली जात होती. आता प्रश्न असा पडतो की, मराठी कुटुंब बंगळुरुमध्ये कसे काय?. पण रजनीकांत यांचे मूळ गाव पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपाठर, पण त्यांचे पूर्वज तामिळनाडूत येऊन राहिले. त्यामुळे त्यांचे सगळे बालपण दक्षिणेत गेले. रजनीकांत घरातील सगळ्यात लहान. त्यांना २ मोठे भाऊ आणि १ बहीण. वडिलांच्या निवृत्तीनंतर सगळे कुटुंब बंगळुरुमध्ये राहण्यासाठी आले. पण त्याचवेळी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी रजनीकांत अवघ्या ९ वर्षांचे होते. त्यामुळे साहजिकच अनेक जबाबदाऱ्या त्यावेळी सगळ्या भावडांवर आल्या.

- Advertisement -

अशी झाली अभिनयाला सुरुवात

रजनीकांत यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड शाळेत झाले. शाळेत असताना त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलची विशेष आवड होती. त्यांच्या भावाने त्यांना रामकृष्णमिशनच्या शाळेत घातल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अध्यात्माची आवड जडली. वेद,शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास त्यांना केला. मठात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. एकदा त्यांना महाभारतावरील आधारीत नाटकात एकलव्याचे काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या उत्तम अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली. ‘कुरुक्षेत्र’, ‘दुर्योधन’ अशा नाटकांमधून त्यांनी महत्वाचे रोल केले.

- Advertisement -

कारपेंटर ते सुपरस्टार

नाटकांमधून काम करत असताना अभिनयाचे व्यसन रजनीकांत यांना जडले होते. पण घरची परिस्थिती पाहता त्यांना कामे देखील करणे गरजेचे होते. म्हणून शाळा करत करत त्यांनी अनेक कामे केली. काही काळ कारपेंटर, कुली अशी कामे करत करत ते बंगळुरुच्या बससेवेमध्ये कंडक्टर म्हणून कामाला लागले. काम करत करत त्यांची अभिनयाची कामे सुरुच ठेवली. पौराणिक नाटकांमधील अनेक पात्रे त्यांनी साकारली होती. त्यांनी केलेली कामे ही कन्नड भाषेमध्ये होती.

म्हणून शिकली तामिळभाषा

एकदा असचं काही चाळत असताना त्यांना नव्याने सुरु झालेल्या मद्रास अॅक्टिंग इन्स्टिट्युट विषयी कळले. शिवाय अभिनय क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या मित्राने त्यांना तामिळ भाषा शिक असे सांगितले. त्यांनी लगेचच हा कोर्स करायला घेतला आणि तामिळ भाषा देखील शिकली.

खलनायकापासून झाली सुरुवात

रजनीकांत यांचा पहिलाच सिनेमा एक वेगळी छाप पाडून गेला. त्यांचा मित्र आणि दिग्दर्शनक भालचंद्र यांनी १९७५ साली त्यांना ‘अपूर्व रागनंगल’ या सिनेमात काम दिले. या सिनेमात त्यांनी एका शिवराळ, वाईट नवऱ्याची भूमिका केली होती. या सिनेमाच्या रिलीजवर अनेक वाद निर्माण झाले. या सिनेमातील अनेक गोष्टी या नात्यांमधील मतमतांतरावर होता. असा विषय या आधी कधीच दाखवला गेला नव्हता. पण सिनेमा रिलीज झाला आणि रजनीकांत यांच्यावर स्तुतीसुमनांचा पाऊस पडू लागला. अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनयाबद्दल छापून येऊ लागले. या सिनेमाला अनेक पुरस्कार देखील मिळाले.

प्रयोगातून यशस्वी

रजनीकांत यांनी सुरुवातीला अनेक प्रयोगशील सिनेमातून कामे केली. पण त्यांच्या प्रत्येक कामाचे कौतुकच झाले. त्यांनी केलेली कामे लोकांना आवडत होती. तामिळ, तेलगू, कन्नड अशा अनेक भाषांमधील सिनेमांमधून काम केले आणि ते दक्षिणेतील सिनेमात थलईवा झाले. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांचे रिमेक देखील केले. अमिताभ बच्चन हे त्यांचे आदर्श होते. त्यामुळे त्यांचा ब्लॉगबस्टर डॉन या सिनेमाचे त्यांनी रिमेक केला. तो देखील चांगला चालला.

शिवाजी झाला रजनीकांत

शिवाजी हे रजनीकांत यांचे मूळ नाव. पण त्यांना रजनीकांत हे नाव कसे पडले हा देखील प्रश्न अनेकांना पडतो. नमन रामचंद्रा यांच्या ‘रजनीकांत’ पुस्तकातील रजनीकांत या पात्राच्या वैशिष्टयावरुन त्यांना रजनीकांत असे नाव पडले. त्यांच्या कामामुळे ते सुपरस्टार झाले आणि मग त्यांना लोकांनी थलईवा म्हणजेच परमेश्वर या पदाला नेऊन ठेवले. अशा या सुपरस्टारचा आज ६७ वाढदिवस…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -