घरमहाराष्ट्रहजारो प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या एसटीची दुरावस्था!

हजारो प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या एसटीची दुरावस्था!

Subscribe

लासलगांव आगाराच्या लासलगांव - सप्तश्रृंगीगड या बसच्या आसनाची अत्यंत दुरावस्था झाली असून महामंडळाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे. नियोजनाच्या अभावामुळे आर्थिक आवक मोठया प्रमाणावर असूनही बसेसच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेअरपार्टच्या खरेदीसाठी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी, गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’, असे बिरुद मिरवणाऱ्या महामंडळच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. लासलगांव आगाराच्या लासलगांव – सप्तश्रृंगीगड या बसच्या आसनाची अत्यंत दुरावस्था झाली असून महामंडळाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे. नियोजनाच्या अभावामुळे आर्थिक आवक मोठया प्रमाणावर असतानाही बसेसच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेअरपार्टच्या खरेदीसाठी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या गाड्या मार्गावर पाठविण्याच्याच लायकीच्या राहिलेल्या नाहीत. तरीही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि केवळ महसूलाच्या वाढीसाठी आगारच्या वतीने या बसेस मार्गावर पाठविण्यात येत आहेत. लासलगाव आगरचा चौकशी फोन नंबर हा कायम नादुरुस्त राहतो. याबाबत अनेक तक्रारी करूनसुद्धा अजूनही लासलगाव आगाराने तत्परता दाखवलेली नाही.

बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु त्यांना पाणी पिण्याची सुविधा ही लासलगाव बस स्थानकावर नाही. स्थानकात बिनधास्तपणे चारचाकी-दुचाकी गाड्यांची पार्किंग होत आहे. दररोज लासलगांव आगारातून ५३ बसेस या १६ हजार किमी आंतर धावत असतात. लासलगांव व परिसरातील ४० पेक्षा जास्त गावातील नागरिक हे या बस स्थानकात प्रवासाकरिता येत असतात. आशिया खंडातील कांद्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने परिसरातील गावातील हजारो नागरिक हे लासलगावमध्ये येत असतात. प्रवासाचे सुरक्षित माध्यम म्हणून नागरिक बसने प्रवास करण्यास पसंत करतात. मात्र, येथे प्रवाशांच्या सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – श्रीरंग बरगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -