घरमनोरंजनBJP खासदार सनी देओलला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा; ११ जवानांसह २ PSO

BJP खासदार सनी देओलला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा; ११ जवानांसह २ PSO

Subscribe

सनी देओल देण्यात आलेल्या वाय श्रेणीत सनी देओलबरोबर ११ जवान असतील, त्याशिवाय दोन PSO हजर असणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेता सनी देओल याची सुरक्षा वाढवली आहे. सनी देओलला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर यानंतर त्याच्या सोबत केंद्रीय सुरक्षा दलाची टीम उपस्थित असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबी रिपोर्ट आणि सनी देओलच्या थ्रेट परसेप्शनच्या आधारे हे संरक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, सनी देओल देण्यात आलेल्या वाय श्रेणीत सनी देओलबरोबर ११ जवान असतील, त्याशिवाय दोन PSO (Personal Security Officer) हजर असतील.

दरम्यान, सनी देओल पंजाबच्या गुरूदासपूरमधील भाजपाचे खासदार आहे. गुरूदापूर भारत आणि पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ असल्याने अशा परिस्थितीत असणारा धोका सर्वाधिक आहे. तर पंजाबमध्ये शेतकरी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना या परिस्थितीत सनी देओलला वायप्लस दर्जाची सुरूक्षा केंद्राकडून पुरवण्यात आली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात जोरदार विरोध करताना शेतकरी संघटनांनी भाजपच्या नेत्यांसह मंत्र्यांना घेराव घालणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

पंजाबहून सनी देओल परतल्यानंतर दीर्घ काळापासून कृषी कायद्याच्या मुद्दय़ावरून त्याच्या मौन विषयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्यानंतर त्याने एक निवेदन जारी केले होते. त्यात त्याने असे म्हटले होते की, त्यांचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेते, सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकण्यास तयार असून ते शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी अकाली दल सोडले त्यानंतर कृषी कायद्याच्या मुद्यावर शेतकऱ्यांचा विरोधही वाढतांना दिसत आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेक बैठका झाल्या मात्र या सगळ्या निष्फळ असल्याचे सध्या दिसत आहे.


बलात्काऱ्याला नपुंसक बनवणार; पाकिस्तानात कठोर कायदा संमत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -