घरमनोरंजन'KBC13'मध्ये सहभागासाठी या 3 गोष्टी गरजेच्या, जाणून घ्या कसे पोहोचाल हॉट सीटवर...

‘KBC13’मध्ये सहभागासाठी या 3 गोष्टी गरजेच्या, जाणून घ्या कसे पोहोचाल हॉट सीटवर ?

Subscribe

रजिस्ट्रेशन,स्क्रीनिंग,ऑनलाइन ऑडिशन, इंटरव्यू अश्या 4 परीक्षेअंतर्गत पास होणार्‍या व्यतीला हॉट सीट वर बसण्याची संधी मिळू शकते.

कौन बनेगा करोडपतीच्या नव्या पर्वाची वाट पाहणाऱ्या मंडळींसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे बिग बी यांचा शो कौन बनेगा करोडपती १३ ची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, “पुन्हा एकदा केबीसीचे प्रश्न घेऊन भेटीला येत आहेत मिस्टर अमिताभ बच्चन… तर उचला फोन आणि व्हा तयार…. कारण १० मे पासून सुरु होत आहेत ‘केबीसी १३’ साठीचे रजिस्ट्रेशन ! ” असे कॅप्शन दिले आहे. या नव्या सीझनचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे. प्रोमो पाहता त्यात बिग बी अमिताभ बच्चन स्टेजवर एन्ट्री करताना दिसून येत आहेत. केबीसीच्या या नव्या पर्वात १० मे पासून दररोज रात्री 9 वाजता च्या सुमारास अमिताभ बच्चन प्रेक्षकांना एक प्रश्न विचारतील आणि त्याचे उत्तर द्यावे लागेल. गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केबीसी च्या सीझन मध्ये काही बदल करण्यात आले होते. केबीसी च्या फॉरमॅट पासून ते लाइफ लाइन पर्यंत मोठे बदल केले गेले या वर्षीच्या सीझन मध्ये देखील हेच रूल पहायला मिळणार आहे. पण यावेळेस ‘केबीसी १३’ मध्ये भाग घेण्यासाठी 3 गोष्टींची सर्वात आधिक गरज आहे. ज्या व्यक्तीजवळ ह्या 3 गोष्टी असतील तो हॉट सीट पर्यंत मजल मारू शकतो.

 

- Advertisement -

काय आहेत 3 गोष्टी ?

- Advertisement -

सोनी टीव्हीने त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर ‘KBC13’ च्या हॉटसीट पर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. ट्विट मध्ये लिहलं आहे की,”प्रयत्न,मेहनत आणि अभ्यास तुम्हाला हॉटसीट पर्यंत घेऊन येऊ शकतो. करोडपती बनण्याची आणि अमिताभ बच्चन यांना भेटण्याच्या संधीचा लाभ घ्या. दररोज रात्री 9 वाजता विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या आणि रजिस्टर करा ‘KBC13’ साठी.

कोरोना व्हायरसच्या प्र्दुर्भावामुळे ‘KBC13’ च्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये देखील बदल करण्यात आला आहे . सिलेक्शन पप्रोसेस पूर्णपने डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. ‘KBC13’ मध्ये भाग घेण्यासाठी 4 विभागाद्वारे सिलेक्शन केले जाईल. रजिस्ट्रेशन,स्क्रीनिंग,ऑनलाइन ऑडिशन, इंटरव्यू अश्या 4 परीक्षेअंतर्गत पास होणार्‍या व्यतीला हॉट सीट वर बसण्याची संधी मिळू शकते.


हे हि वाचा – ट्विटर हॅण्डल गमावले, आता इन्स्ट्राग्रामचाही कंगनाविरोधी कारवाईचा पवित्रा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -