Video: कॅटचा बॉक्सिंग व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

लवकरच कतरिना कैफ चाहत्यांसाठी काही तरी खास घेऊन येणार आहे.

bollywood actress katrina kaif boxing video viral on instagram

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमी तिच्या हटके स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर बऱ्याचदा कतरिनाचे जिम मधील व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. कतरिना कैफ सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. कारण या व्हिडिओमध्ये ती बॉक्सिंग करताना दिसत आहे. कतरिनाचा हा व्हिडिओ तिने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना कतरिनाने खूप मजेदार कॅप्शन दिलं आहे. लवकरच ती चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. म्हणून तिने अशाप्रकारचे कॅप्शन दिलं आहे की, ‘लवकरच काहीतरी खास येणार आहे.’ चाहत्यांनी या व्हिडिओला खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटानंतर कतरिना कैफ बॉलिवूडच्या खिलाडीसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘धर्मा प्रोडक्शन’ आणि ‘रोहित शेट्टी पिक्चर्स’च्या निर्मितीखाली हा चित्रपट तयार होत असून पुढच्या वर्षी २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, अजय देवगण यांच्यासह अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा – Video: किंग खानच्या मुलीचा डेब्यू चित्रपट रिलीज