बॉलिवूडवाल्यांनो… राजकारणापासून दूर राहा; कंगनाचं ट्वीट पुन्हा चर्चेत

बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. कंगना अनेकदा सोशल मीडियावरुन बॉलिवूड कलाकार आणि बॉलिवूड चित्रपटांविरोधात भाष्य करताना दिसते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. यावेळी ती ‘पठाण’ चित्रपट खूप छान आहे असं म्हणाली होती. कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, अशातच आता कंगनाने ‘पठाण’ चित्रपटाबाबत एक ट्वीट केलं आहे. ज्यात कंगनाने बॉलिवूड वाल्यांवर निशाणा साधला आहे.

कंगनाचं ट्वीट पुन्हा चर्चेत


यावेळी कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहिलंय की, “बॉलिवूडवाल्यांनो ही गोष्ट दाखवायचा प्रयत्न करु नका की, या देशामध्ये तुम्ही हिंदूंच्या द्वेषाला समोरे जात आहात. ‘द्वेषावर विजय’ हा शब्द जर मी पुन्हा ऐकला तर तुमची देखील तशीच शाळा घेतली जाईल जी काल घेतली गेली होती. तुमच्या सफलतेचा आनंद साजरा करा आणि चांगलं काम करा. राजकारणापासून दूर राहा.” असं कंगना म्हणाली. सध्या कंगनाचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण तिच्या ट्ववीटवर प्रतिक्रिया देत आहेत.

 


हेही वाचा :