रिया कपूरने असा सेलिब्रेट केला पती करणच्या वाढदिवस; शेअर केले रोमँटिक फोटो

bollywood rhea kapoor shares romantic photos with karan boolani on his birthday
रिया कपूरने असा सेलिब्रेट केला पती करणच्या वाढदिवस; शेअर केले रोमँटिक फोटो

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूरचा काही महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर करण बलूनीसोबत लग्न झाले. अशातच रिया कपूरने पतीच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अगदी स्पेशल असा साजरा केला आहे. रियाने पती करण बलूनीच्या वाढदिवसानिमित्त काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करण रियाला लिपलॉक करताना दिसतोय. रियाचे हे फोटो चाहत्यांनाही अधिक आवडलेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

रियाने पती करणाच्या वाढदिवसानिमित्त घरात मेणबत्त्या आणि दिव्यांची खास सजावट केली होती. यावेळी दोघांनी एकमेकांसोबत स्पेशल असा क्वालिटी टाईम स्पेंड केला. या फोटोंवरून अंदाज लावू शकता की, रियाने पतीचा बर्थडे स्पेशल करण्यासाठी खूपच मेहनत घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

रियाने वाढदिवसातील काही फोटो शेअर केले आहेत. य़ा फोटोंसह रियाने कॅप्शनमध्ये लिहिले, माझ्या सोबत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा… तुझ्यासोबतचे प्रत्येक वर्ष आणि मॅजिकल आणि कंम्पलीट करणारा असतो. असंच कोणीच नाही ज्याच्यासह मी पुढे जाऊ शकते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

या फोटोमध्ये रियाने पिवळ्या रंगाचा खास गाऊन परिधान केला आहे. तर करणने व्हाईट रंगाचा शर्ट घातली आहे. दोघांचा ही लूक अधिकच रोमँटिक वाटतोय. यावेळी करणने केक कटिंग करत दोघांनी एकत्र कँडिल लाईट डिनर देखील केला. दिवाळीपूर्वीच रियाने करणच्या वाढदिवसानिमित्त घराला आकर्षक दिव्यांनी सजवले होते.