घरमनोरंजनए.आर.रहमानचा 99 Songs सिनेमा आज प्रदर्शित, 'या' वर पाहू शकाल सिनेमा

ए.आर.रहमानचा 99 Songs सिनेमा आज प्रदर्शित, ‘या’ वर पाहू शकाल सिनेमा

Subscribe

कोरोना महामारीमुळे सध्या थिएटर बंद आहेत. त्यामुळए ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत अनेक बॉलिवूडचे बडे कलाकारही वेबसिरिज किंवा ओटीटी बेस सिनेमांकडे वळताना दिसत आहे. यात आता अनेक निर्माते, दिग्दर्शकांनीही ओटीटीकडे आपली आपला मोर्चा वळवला आहे. यात बॉलिवूडच्या दंगब खान सलमाननेही आपला बहुचर्चित राधे सिनेमा नुकताच ओटीटीवर रिलीज केला. यापाठोपाठ आता ए.आर.रहमानचा बहुचर्चित 99 Songs (९९ सॉग्न्स) सिनेमा नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर आज रिलीज झाला. या सिनेमाच्या माध्यमातून ए.आर.रहमानने निर्माता आणि सिनेमा लेखन क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले आहे. 99 Songs हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

ए.आर.रहमानने केवळ या सिनेमाचे दिग्दर्शनच नाही केल तर या सिनेमासाठी को-राइटस आणि म्यूझिक कंपोजरची जबाबदारीही सांभाळली आहे. विश्वेश कृष्णमूर्ति यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून इहान भट्ट आणि एडिल्सी वर्गसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध संगीतकार अशी ओळख निर्माण करणारा ए.आर.रहमाननेच आपल्या नव्या सिनेमाबद्दल सोशल मीडियातून जाहीर केले. 99 Songs बद्दल ट्विट करत ए.आर.रहमानने लिहिले की, तुमचा मूड चांगला करण्यासाठी 99 Songs सिनेमा नेटफिल्सवर स्ट्रिम केल्याचे जाहीर करत आहे.

- Advertisement -

याशिवाय जिओ स्टुडिओनेही ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. जिओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ’99 सॉन्ग्स मधील संगीत ऐकण्यासाठी जिओ जॉइन करा. डिजिटल प्रिमियर
#99songs ची निर्मिती आणि लेखन ए.आर.रहमानने केले आहे. या सिनेमातून एहान भट्ट आणि एडिल्सी वर्गसही स्टार्स २१ मे रोजी जियो सिनेमावर पाहू शकाल.

जवळपास १२ गाण्यांच्या या सिनेमात नवीन कलाकारांना संधी देण्यात आली आहे. या चित्रपटात इहान भट्ट आणि एडिल्सी वर्गस, रणजित बारोट, तेनजिन डाल्हा, राहुल राम, लिजा रे आणि मनीषा कोईराला झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा जय नावाच्या व्यक्तीची आहे. जो त्याची प्रेयसी सोफी आणि संगीतावर खूप प्रेम करतो. तर सोफीच्या वडिलांनी तिला एक संगीतातले आव्हान दिले आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना ए.आर. रहमान म्हणाला की ‘माझी प्रोडक्शन कंपनी YM Movies चे जिओ स्टुडिओसह असलेले कॉलाबरेशनने मला खूप आनंद झाला आहे. दोघांनी मिळू एक एक्सपरिमेंटल चित्रपट घेऊन आलो आहोत.


COVID19: कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुले आणि अनाथ ज्येष्ठांचा सुरक्षेसाठी केंद्राने राज्य सरकारला केल्या मार्गदर्शक सूचना


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -