घरमनोरंजनश्रीदेवींची आठवण निघाली अन् भावूक झाले बोनी कपूर

श्रीदेवींची आठवण निघाली अन् भावूक झाले बोनी कपूर

Subscribe

आजही श्रीदेवीला विसरू शकत नाही. तिला विसरण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु ते अशक्य आहे.

अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाची दुःखद घटना अजूही पचवू शकले नाही. श्रीदेवीच्या चाहत्यांसह तिचा पती बोनी कपूर यांनाही मोठा धक्का बसला. बोनी कपूर यांना काही प्रसंगात भावूक होताना पाहिले आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पत्नी श्रीदेवींविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आल्याचे दिसते.

श्रीदेवीबद्दल बोलताना झाले भावूक

चित्रपट अॅनलिस्ट कोमल नाहटाच्या चॅट शोमध्ये गप्पा मारताना श्रीदेवी बद्दल बोलताना बोनी कपूर अधिक भावूक झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, मी आजही श्रीदेवीला विसरू शकत नाही. तिला विसरण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु ते अशक्य आहे.

- Advertisement -

श्रीदेवीला विसरणं अशक्य

चित्रपट अॅनलिस्ट कोमल नाहटाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एपिसोडचा टिझर व्हिडिओ शेअर केला आहे. हा एपिसोड ५ मे ला टेलिकास्ट होणार आहे. या शो दरम्यान, बोनींना प्रश्न विचारला की, असा कोणता प्रसंग आहे ज्यावेळी श्रीदेवींची आठवण आली नाही. या प्रश्नावर उत्तर देताना बोनी कपूर आश्रु लपवत म्हणाले, श्रीदेवींना पुर्णपणे विसरणं हे माझ्याकरिता शक्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -