घरमनोरंजनउदय सिंह गौरी आणि कृतिका कामरामध्ये ब्रेकअप?

उदय सिंह गौरी आणि कृतिका कामरामध्ये ब्रेकअप?

Subscribe

कृतिकाने रिलेशनशिप बद्दल अद्याप काही खुलासा केला नाहीये. कृतिकाला उदय सिंह गौरी बद्दल विचारले असता तिने स्पष्टपणे नकार दिला

अभिनेत्री कृतिका कमराच्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक गोष्टींची सध्या चर्चा सोशल मीडिया तसेच माध्यमावर रंगताना दिसतेय. गेल्या अनेक दिवसांपासून कृतीकाचे नाव उदय सिंह गौरी (Uday Singh Gauri) सोबत जोडले जात आहे. इतकेच नाही तर त्यांनी गुपचुप साखरपुडा केला असल्याची माहिती समोर आली होती. नुकतच कृतिकाला या सर्व घडामोडीबद्दल विचारले असता कृतीकाने काही वेगळेच उत्तर दिले. जेव्हा कृतिकाला तिच्या रिलेशनशिप आणि उदय सिंह गौरी याच्यासोबत झालेल्या साखरपुड्या बद्दल विचारण्यात आले असता तिने नकार दिला ” नाही माझा साखरपुडा झाला नाहीये. माला माहिती नाही या सर्व गोष्टींची सुरुवात कधी व कशी झाली. माझे लग्न आणि साखरपुडा यापैकी काहीही झालं नाहीये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika Kamra (@kkamra)

- Advertisement -

कृतिकाने रिलेशनशिप बद्दल अद्याप काही खुलासा केला नाहीये. कृतिकाला उदय सिंह गौरी बद्दल विचारले असता तिने स्पष्टपणे नकार दिला तसेच कृतिका म्हणाली “सध्या आम्ही आइसोलेटेड आहोत. मी मुंबई मध्ये आहे. मी नेहमीच माझे आयुष्य मनमोकाळेपणाने जगत आली आहे. काहीच लपवले नाही माझ्या व्यक्तीगत आयुष्यात असे काहीच खास बाब सांगण्यासारखी नाहीये. जर काही विशेष असल्यास मी नक्कीच शेअर करेन.”कृतिकला ती सिंगल आहे का ? असे विचारले असता तिने संपूर्ण मुलाखती मध्ये उडवा-उडवीची उत्तर देत. स्पष्ट उत्तर दिले नाही.

कृतिकाच्या ब्रेकअपच्या चर्चा सतत रंगत असतात. अभिनेता करन कुंद्रा सोबत देखील कृतिका अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. काही खाजगी कारणामुळे दोघांचाही ब्रेक अप झाल्याची माहिती समोर आली होती

- Advertisement -

हे हि वाचा – 3 Idiots सिनेमात ‘या’ सीन वेळी अभिनेता आमिर,शर्मन आणि आर माधवन खरचं प्यायले होते दारु

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -