घरठाणेभिवंडीत धान्याचा काळाबाजार; नऊ टन रेशनिंगचे तांदूळ ताब्यात

भिवंडीत धान्याचा काळाबाजार; नऊ टन रेशनिंगचे तांदूळ ताब्यात

Subscribe

  धान्य आणि टेंपो पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे यांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिला असून टेंपो मालक बाळू शेठ आणि चालक छोटू यादव यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला.

पडघा परिसरातील रेशनिंग दुकानांवर गरीब लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारा गहू , तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेपो एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पडघा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी पडघा येथील वजन काट्यासमोर घडली आहे. पडघा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार आदिवासी, गोरगरीब लाभार्त्यांना धान्य न देता दुकानातील गहू ,तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करतात अशी माहिती या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली असता संघटनेचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई – नाशिक महामार्गावरील वजन काट्यावर सापळा लावला. त्यावेळी एक आयशर टेंपो  धान्याने भरलेल्या प्लास्टिकच्या गोणी वजन करण्यासाठी आला. त्यानंतर टेंपो चालकाला तपासणीसाठी थांबवून त्याच्याकडे गहू, तांदळाच्या खरेदी पावत्या मागितल्या.

मात्र चालक छोटू यादव याने बोगस पावत्या दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यावेळी टेम्पोत वेगवेगळ्या कंपनीच्या छपाई असलेल्या गोणी आढळून आल्या. या गोणींमध्ये रेशनिंगचा गहू, तांदूळ असल्याचा संशय बळावल्याने श्रमजीवी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अधिक पाटील व पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी तालुका पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे आणि पडघा पोलिसांचे पथक तात्काळ पोहचले. त्यांनी त्वरित पंचनामा सुरू केला असता टेंपोत ५० किलो वजनाच्या गव्हाच्या १०० गोणी तर तांदळाच्या ६० गोणी आशा एकूण सुमारे ९ टन वजनाच्या २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे गहू, तांदूळ आढळून आले.

- Advertisement -

हा गहू, तांदूळ पडघा येथील धान्य व्यापारी सचिन सतिष बिडवी यांच्या गोदामातून भरल्याची कबुली चालक छोटू यादव याने दिली आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा सुरु असताना रेशनिंग दुकानदार अशोक पाटील रा. आमणे व अशोक भोईर रा.धामणगांव हे दोघे घटनास्थळी येऊन धान्य व्यापारी सचिन बिडवी यांना एकवेळ माफ करा अशी विनवणी करू लागले. त्यामुळे या काळ्या बाजारातील धान्य विक्रीत या दोघा रेशनिंग दुकानदारांचा सहभाग असावा, असा संशय संबंधितांनी पंचनाम्यात व्यक्त केला आहे. हे धान्य आणि टेंपो पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे यांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिला असून टेंपो मालक बाळू शेठ आणि चालक छोटू यादव यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रेशन दुकानदारांना पडघा पोलोसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती पडघा पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -