घरमनोरंजनSonam Kapoor च्या घरी चोरी; चोरट्यांनी १.४१ कोटींच्या रोकड आणि दागिन्यांवर...

Sonam Kapoor च्या घरी चोरी; चोरट्यांनी १.४१ कोटींच्या रोकड आणि दागिन्यांवर मारला डल्ला

Subscribe

सोनम कपूरच्या आजे सासूबाईंनी तुघलक रोड येथील पोलिस ठाण्यात या चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. तुघलक पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आता तपास चालू केला आहे. परंतु हे प्रकरण अतिशय हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला गांभिर्याने घेतले असून तपासासाठी अनेक पथक तयार केली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ती सध्या तिचा पती आनंद अहुजासोबत दिल्ली येथे राहते. त्यांच्या या राहत्या घरातून चोरट्यांनी रोकड आणि दागिन्यांसह १.४१ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केले आहे. सोनम कपूरच्या आजे सासूबाईंनी तुघलक रोड येथील पोलीस ठाण्यात या चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तुघलक पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तपास चालू केला आहे. परंतु हे प्रकरण अतिशय हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने घेतले अधिक वेगाने तपास करण्यासाठी अनेक पथक तयार केली आहेत.

सोनम कपूरच्या या राहत्या घरात २५ नोकर, ९ केअर टेकर आणि वाहन चालक, माळी तसेच अन्य कर्मचारीसुद्धा आहेत. या सर्वांची पोलिस चौकशी करत आहेत. क्राइम टीमसह या प्रकरणात एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. आतापर्यंत कोणत्याही आरोपींचा शोध लागला नाही. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवले होते. परंतु, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.

- Advertisement -

नवी दिल्लीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे सासरे २२ अमृता शेरगिल येथे राहतात, इथे तिची आजेसासू सरला अहुजा, मुलगा हरीश अहुजा आणि सून प्रिया अहुजा यांच्या सोबत राहते. या चोरीबाबतची तक्रार सरला अहुजा यांनी २३ फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस ठाण्यात केली की, त्यांच्या कपाटातून १.४० कोटी रुपयांचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाली आहे. सरला अहुजा यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दागिने तपासून कपाटात ठेवले होते.

- Advertisement -

पोलीस आता एक वर्षापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. सोनम कपूरचा पती आनंद अहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तो वारंवार इथे येत-जात असतो.


हेही वाचा :Mee Vasantrao Trailer : ‘मी वसंतराव’चा ट्रेलर प्रदर्शित ! राहूल देशपांडे उलगडणार वसंतराव देशपांडेंचा सांगितीक प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -