घरमनोरंजनकॉमेडियन राजू श्रीवास्तव AIIMSमध्ये व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव AIIMSमध्ये व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक

Subscribe

राजू श्रीवास्तव यांना AIIMS मध्ये त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती नासूक असल्यामुळे त्यांना इमरजन्सी मेडिसीन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी सीसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं.

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं . त्यांना दिल्लीच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, AIIMS मध्ये त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती नासूक असल्यामुळे त्यांना इमरजन्सी मेडिसीन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी सीसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील चित्रपट विकास परिषदचे चेअरमन आहेत. दिल्लीमध्ये ते राजू श्रीवास्तव पक्षातील काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथील हॉटेलमधील जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि ते खाली पडले. त्यावेळी त्यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. AIIMS मध्ये त्यांना वेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, राजूंची प्रकृती खराब होण्याची बातमी कळताच राजू यांचे चाहते निराश झाले आहेत. ते लवकर बरे व्हावे याची अनेकजण कामना करत आहेत.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख

- Advertisement -

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.


हेही वाचा :सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका; दिल्ली हॉस्पिटलमध्ये भर्ती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -