Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सायरा बानो यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र एंजिओग्राफी करण्यास नकार!

सायरा बानो यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र एंजिओग्राफी करण्यास नकार!

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या सहवासात ५४ वर्ष असणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दिलीप कुमार यांच्या जाण्याला दोन महिने उलटून गेले असले तरी सायरा बानो या दुखाःतून स्वतःला सावरू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू होते मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासामध्ये त्यांना हृदयाशी निगडीत समस्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करणे आवश्यक आहे. परंतू सायरा बानू यांना एंजिओग्राफी करण्यास नकार दिला असल्याचे सायरा बानू यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पीटीआयला सांगितले.

सायरा बानो यांची तब्येत बिघडल्याने ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी सायरा बानो यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितिन गोखले यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, सायरा यांचे लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झालं आहे. यामुळे त्यांची अँजियोग्राफी करावी लागणार आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत हळू-हळू सुधारणा होत आहे. पुढे त्यांनी असेही सांगितले की, सायरा बानू यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. त्यानंतर काही काळानंतर पुन्हा त्यांना एंजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांची परवानगी असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, अद्याप त्यांनी एंजिओग्राफीसाठीची परवानगी दिलेली नाही.

- Advertisement -

याचदरम्यान सायरा बानू यांच्या प्रवक्ता फैसल फारुकी यांनी बुधवारी सायरा यांच्या तब्येतीबाबत माहिती दिला व म्हणाले की , दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना खूप तणाव सहन करावा लागला आणि त्यामुळे त्यांच्या ओरोग्यावरही याचा गंभीर परीणाम झाला आहे. सायरा बानो ७६ वर्षांच्या आहेत. जेव्हा सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले होते. पण दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो यांची काळजी कशी घ्यावी? हे त्यांच्या कुटुंबियांना समजत नाही आहे.


- Advertisement -