घरमनोरंजनऐका राखी सावंत सांगते लग्नानंतरच्या व्यथा

ऐका राखी सावंत सांगते लग्नानंतरच्या व्यथा

Subscribe

राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी ती विवाहित जीवनामध्ये सुखी नसल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत फारच अॅक्टिव असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली होती. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे ती अजून चर्चेत आली. आता तिने विवाह केल्यानंतरच्या व्यथा रडत सांगून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये ती रडत सांगत आहे की, ‘तुम्ही मला जे सांगाल ते मी करेन, ऐकेन मात्र तुम्हाला दुर्लक्ष करणार नाही. तुमच्या शिवाय मी राहू शकत नाही. जरी तुम्हाला माझी दया देत नसेल तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.’

- Advertisement -

नक्की वाचा राखीने शेअर केले हॉट हनिमून फोटो

या अगोदर राखीने एक हिंदी डायलॉगचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती तिच्या आयुष्यातील त्रासाबद्दल बोली आहे आणि या त्रासावर ती कशी मात करते हे सांगितलं आहे.

तसंच तिने एका व्हिडिओमध्ये हिंदी गाण्याच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातल्या व्यथा मांडल्या आहेत. तिने अद्याप ही तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला नाही. तरी देखील तिने नवऱ्याला खूप मिस करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. तिच्या चाहत्यांनी ती विवाहित जीवनामध्ये सुखी नसल्याचं म्हटलं आहे. याआधी तिने इन्स्टाग्रामवर हनिमूनचे फोटो शेअर केले होते. तिचे हे देखील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखी सावंत ही आता कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन झाली आहे. जरी तिने नवऱ्याबाबत गुपित ठेवले असले तरी तिच्या चाहत्यांना तिचा नवरा पाहण्यात उत्सुकता लागली आहे.


हेही वाचानवविवाहित राखी सावंतचा महिनाभरात काडीमोड?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -