घरमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला ईडीचे समन्स

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला ईडीचे समन्स

Subscribe

'लायगर चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता हा चित्रपट 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. हवालाच्या पैशासह विदेशी निधी चित्रपटात गुंतवल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. याप्रकरणी पुरी जगन्नाथ आणि चार्मीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ‘लायगर चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता हा चित्रपट 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही.

‘लायगर’ चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन याअभिनेतत्री मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाचे प्रमोशन सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा यांच्याकडून चित्रपटासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याच्या टीमला दिलेल्या पैशांबाबत चौकशी केली जात आहे. तत्पूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी 17 नोव्हेंबर रोजी चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि अभिनेत्री-निर्माती चार्मी कौर यांचीही चौकशी केली होती.

- Advertisement -

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे मेगा शूटिंग लास वेगास येथे झाले. या चित्रपटात माईक टायसननेही कॅमिओ केला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही आणि तो फ्लॉप ठरला. तोपर्यंत चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर झाले होते. काँग्रेस नेते बक्का जुडसन यांनी चित्रपटातील संशयास्पद गुंतवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आहे. राजकीय व्यक्तींनी ‘लायगर’ मध्ये पैसे गुंतवले असल्याची तक्रार बक्का जुडसन यांनी केली. त्यांनी दावा केला की गुंतवणूकदारांना त्यांच्या काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

FEMA चे उल्लंघन करून चित्रपट बनवण्यासाठी परदेशातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या आरोपाबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. अनेक कंपन्यांनी चित्रपट निर्मात्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्याला ज्यांनी पैसे पाठवले आणि माईक टायसन आणि तांत्रिक टीमसह परदेशी कलाकारांना पैसे कसे दिले गेले याचा तपशील देण्यास सांगितले होते.

- Advertisement -

हे ही वाचा – वाघाच्या जवळ जाऊन व्हिडीओ काढणं रवीना टंडनला पडलं महागात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -