मृत गोविंदा प्रथमेश परबच्या कुटुंबियांना विम्याचे १० लाख रुपये भाजपकडून सुपूर्द

10 lakh rupees insurance to the family of deceased Govinda Prathamesh Parab handed over by BJP

मुंबई  -: दहिहंडी उत्सवात दुर्दैवाने अपघात झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या भांडूप येथील प्रथमेश परब याच्या कुटुंबियांना भाजपाने काढलेल्या विम्याचे ९ लाख ९९ हजार रूपये बुधवारी सुपुर्द करण्यात आले. भाजपचे स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी स्वतः प्रथमेश याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांच्या हातात धनादेश दिला.

भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने दरवर्षी दहिहंडीसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार सुमारे 50 हजार गोविंदांचा दि.ओरियंट इन्शुरंन्स कंपनी मार्फत विमा उतरविण्यात येतो. यावर्षी दहिहंडी उत्सवाप्रसंगी गोविंदा कु.प्रथमेश परब याचे अपघामुळे दुर्दैवाने निधन झाले. त्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी तर्फे ओरियंटल इन्शुरंन्स कंपनीने दिवंगत प्रथमेश याच्या नावे असलेल्या विम्याचे रुपये ९ लाख ९९ हजार रुपये पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

भाजपचे स्थानिक खा. मनोज कोटक आणि भाजपा कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी बुधवारी
प्रथमेशच्या भांडूप येथील घरी स्वतः त्याच्या वडिलांकडे सदर मदतीचा धनादेश सुपूर्द केला. दिवंगत प्रथमेशच्या जाण्याने कुटुंबाची झालेली हानी ही पैशाने भरुन निघणारी नाही. पण आम्ही या कुटुंबासोबत आहोत एवढा धीर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


‘उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल’; अजित पवारांचा निशाणा