खलिस्तान समर्थकांना आव्हान देत कंगना म्हणाली, “…लाज वाटते का?”

यात तिने आपल्या तीन वर्षापूर्वीच्या आठवणी सांगताना लिहिले की, “जेव्हा मी ३ वर्षांपूर्वी खलिस्तानीविरूद्ध..."

Kangana Ranaut On khalistan
यात तिने आपल्या तीन वर्षापूर्वीच्या आठवणी सांगताना लिहिले की, “जेव्हा मी ३ वर्षांपूर्वी खलिस्तानीविरूद्ध..."

अभिनेत्री कंगना रनौत बर्‍याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या वेगवेगळ्या पोस्टवरून ती कोणत्या ना कोणत्या वादात पडताना दिसते. ती वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करीत असते. आता कंगना रनौतने खलीस्तानच्या मुद्द्याला हात घातलाय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळजनक दावा केलाय. काही वर्षांपूर्वी तिने खलिस्तानीसविरूद्ध आवाज उठविला, त्यानंतर तिला बरेच ब्रँड गमावावे लागल्याचं तिने यात म्हटलंय.

कंगना रनौतने आपल्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर केलीय. यात तिने आपल्या तीन वर्षापूर्वीच्या आठवणी सांगताना लिहिले की, “जेव्हा मी ३ वर्षांपूर्वी खलिस्तानीविरूद्ध आवाज उठवला, तेव्हा सर्व ब्रँडने माझ्यासोबतचा करार मागे घेतला. लाखो लोकांनी मला अनफॉलो केलं. डिझाइनर्सनी माझ्या फोटोसहित शेअर केलेल्या पोस्ट डिलीट करून टाकल्या आणि माझ्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. आज पंजाबची दहशत पाहून त्यांना लाज वाटते का? त्यांनी चूक केली असं त्यांना वाटतं का? की रक्त प्यायची तहान लागली होती, तुम्ही कोणाचे प्यायले, का प्याले? हे सारं काही अप्रासंगिक आहे?’ , असं देखील कंगनाने यात म्हटलंय.

“जर थोडीशी माणुसकी असेल तर त्यांना थोडीशी का होईना लाज वाटेल. परंतु जर तिथे राक्षसे असतील तर धर्माचा नाश आणि अधर्माचा विजय हेच तर त्यांचं काम आहे. त्यांना कसलीच लाज वाटणार नाही… विचार करा आणि स्वतःलाच विचारा.”