ईशा देओलचा मुलीच्या हक्कासाठी एल्गार, ट्रेलर रिलिज

ईशा देओल ही लवकरच डिजिटल डेब्यू करताना दिसणार आहे. दिग्दर्शक राम कमल मुखर्जी याचा ‘एक दुवा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामध्ये ईशा देओल, बार्बी शर्मा, श्रेयांश निक नाग आणि राजवीर अंकुर सिंह आहेत. या चित्रपटाची कथा एका आई वर आधारित आहे. जी आपल्या मुलीच्या हक्कासाठी स्वत:च्याच कुटुंबाशी लढत आहे. ईशा ही एका मुस्लिस कुटुंबाचा भाग असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे.

हल्लीच ईशाने तिच्या नवऱ्या सोबत एकत्रित ‘भरत ईशा प्रोडक्शन’ या नावाने प्रोडक्शन हाउस लॉन्च केले आहे.ईशाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून ट्रेलर शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली ‘२६ जुलैला एक दुवा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यासाठी मला आपलं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छांची आवश्यकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Deol Takhtani (@imeshadeol)

ईशा देओलने तिच्या करियरची सुरूवात ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटामधून केली. त्यानंतर धूम, काल, नो एंट्री, शादी नंबर 1, प्यारे मोहन, अनकही, टेल मी ओ खुदा यापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. २०११ नंतर बॉलीवुड मधल्या कोणत्याच चित्रपटामध्ये ती दिसली नाही. मग २०१२ मध्ये ईशा देओलने भरत तख्तानी सोबत लग्न केले आणि आता तिला दोन मुली आहेत.